सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास विविध संघटनांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.थेरो दिंपकर (भन्ते) यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पाडण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, कार्याध्यक्ष अनिल वीर, कोषाध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ,उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर,ऍड.कुमार गायकवाड,अशोक भोसले, अशोक कांबळे,चंद्रकांत मस्के,संबोधी प्रतिष्ठानतर्फे उपाध्यक्ष इंजि.रमेश इंजे आणि सहकारी,ज्येष्ट नागरिक संघातर्फे अध्यक्ष शामराव बनसोडे,सचिव बी.एल. माने,भारतीय बौद्ध महासभेतर्फे जिल्हाध्यक्षा संगीताताई डावरे, तालुकाध्यक्ष ऍड. विजयानंद कांबळे, माजी अध्यक्ष आबासाहेब दणाने, केंद्रीय शिक्षक भागवत भोसले,मनोज वाघमारे,मंगेश डावरे,धम्मशील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विलास कांबळे व सहकारी,वंचिततर्फे जिल्हा सचिव गणेश भिसे, उपाध्यक्ष संदीप कांबळे, सौ.व सतिश कांबळे, शहराध्यक्ष मिलिंद कांबळे व सहकारी, रिपब्लिक पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ आणि सहकारी, सौ.व श्री.रवींद्र देवकांत, जय होलार सामाजिक सेवा संस्था पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रशांत खांडेकर व सहकारी,रिपब्लिकन सेनेचे दादासाहेब केंगार,समतादूत विशाल कांबळे,त्रिरत्न महासंघातर्फे धम्मचारी संघादित्य,विश्वास सावंत,प्रवीण धस्के आदी, शासकीय-अशासकीय कार्यालयातील अधिकारी, पदाधिकारी,कर्मचारी,विविध राजकीय,सामाजिक,धार्मिक, पत्रकारिता आदी संघटनांच्या प्रतिनिधींची अभिवादानासाठी दिवसभर वर्दळ चालू होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास सकाळी १० ते रात्री उशिरापर्यंत सर्व क्षेत्रातील अधिकारी-पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुष्पहार-पुष्पांजली अभिवादन करण्यात आले.
भीमाबाई आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे स्मृतिस्थळावरही विविध संघटनांनी टप्प्या टप्प्याने भेट देऊन महापुरुष व भिमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.यावेळी सुदाम आवडे,वामन गंगावणे व त्यांचे सहकारी तसेच रमेश इंजे,पार्थ पोळके,ऍड. जे. तुकाराम,डॉ.दिलीप कांबळे, रवींद्र धडचिरे,जगनाथ धडचिरे, किरण गाडे,हौसेराव धुमाळ, गणेश कारंडे,ऍड.विलास वहागावकर,अनिल वीर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
पूर्वसंध्येला डॉ.बाबासाहेब आंबेडकर समितीचे व महासभेचे पदाधिकारी,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.सकाळी पुतळ्याजवळ चंद्रकांत खंडाईत यांनी अभिवादपर मनोगत व्यक्त केले तर सायंकाळी धम्मचारी उपायराजा यांचे प्रवचन संपन्न झाले.तदनंतर भिमाई स्मृतिस्थळापर्यंत कँडल मार्चने सांगता करण्यात आली.