महाबळेश्वरमध्ये महामानवाला अभिवादन..

0

 महाबळेश्वर, दिनांक 6 डिसेंबर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज महाबळेश्वर शहर वासियां तर्फे बाबा साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या  वेळी या कार्यक्रमास महाबळेश्वर शिवसेना शहरप्रमुख विजय भाऊ नायडू, उपशहर प्रमुख सचिन गुजर, गोविंद कदम, राजाभाऊ पंडित, पंकज येवले, ङेमोक्रॅटिक पार्टी आॅफ इंङिया सातारा जिल्हा कामगार आघाङीचे अध्यक्ष ऋषिकेश वायदंडे, साई नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे, किरण मोरे, रमेश चौधरी, वंचित बहुजन आघाङीचे उत्तम भालेराव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व आंबेडकर प्रेमी  तसेच महाबळेश्वर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

  यावेळी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. महाबळेश्वर शिवसेना शहरप्रमुख विजय भाऊ नायडू यांनी यावेळी बोलताना बाबासाहेबांच्या सामाजिक समतेच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here