महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्जांवर कार्यवाही करण्याचे आवाहन

0

सातारा दि. 24 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने  अनु. जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व विद्यावेतन या योजनांचा लाभ देण्यात येतो. वरील सर्व योजना शासना मार्फत Mahadbtmahait.gov.in या प्रणालीवरुन ऑनलाईन राबविण्यात येत आहेत.

शैक्षणिक वर्ष 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज भरण्यासाठी दिनांक 22 सप्टेंबर 2022 पासुन अर्ज स्वीकारण्यास व मंजुरी  करण्यास  सुरुवात  झालेली आहे, याबाबत  सहायक आयुक्त, समाजकल्याण सातारा यांचेकडुन वेळोवेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयातील अनु.जाती प्रवर्गातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्ज भरुन शिष्यवृत्ती अदागाई होणेकामी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे ऑनलाईन सादर करणेबाबत सुचित केलेले होते. परंतु, बहुतांश महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या अर्जांवर कार्यवाही केली नसलेली बाब समोर आलेली आहे.  अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज मंजुरीअभावी महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. अशा अर्जांवर 30 जानेवारी 2023 पर्यंत कार्यवाही करावी, असे अवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण नितीन उबाळे यांनी  यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here