महिमानगड फाऊंडेशनचा चौथा वर्धापन दिन गडावरती उत्साहामध्ये साजरा.

0

महिमानगड फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन गडावरती उत्साहामध्ये साजरा, महिमानगड फाऊंडेशन संस्थेचे कार्य प्रेरणादायक: डॉ. सचिन जोशी

गोंदवले-  नुकताच महिमानगड सामाजिक विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य या संस्थेचा चतुर्थ वर्धापन दिन महिमानगड येथे उत्साहामध्ये पार पडला. कार्यक्रमाची शिवमूर्ती पूजन व त्यानंतर ध्वजपुजन करून सुरुवात करण्यात आली. भव्य ऐतिहासिक नाणी प्रदर्शन व गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रम सुरुवातीस महिमानगड फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन ऊर्फ  गणेशजी गोडसे यांनी प्रमुख अतिथी यांचे  स्वागत करून दुर्ग भ्रमंती केली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सचिनजी जोशी यांनी हनुमान मंदिरास अभिवादन केले 

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल पाच पुरस्कार  देण्यात आले. यामधे सहकार क्षेत्रातील पुरस्कार मा. प्रशांत भांडवले, वृक्ष व जलसंवर्धन पुरस्कार रोहित व रक्षीता बनसोडे,  क्रीडा पुरस्कार मा. राहुल जगदाळे, कुशल सामाजिक संस्था पुरस्कार हरित वसुंधरा संस्था, दहिवडी आणि सांस्कृतिक पुरस्कार शाहीर यशवंत जाधव यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सचिन जोशी (संचालक, राज्य दुर्ग समिती पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन) शैलेश सूर्यवंशी ( प्रांताधिकारी माण-खटाव), अमित बोडके (संचालक आणि सीईओ अक्षौहिणी प्रा. लि. पुणे), नागेश पाटील (सीओओ अक्षौहिणी प्रा. लि. पुणे) डॉ. सौ. प्रिया शिंदे (अध्यापिका, कन्हेरी मठ, कोल्हापूर), अक्षय सोनवणे पोलीस उपअधीक्षक, दहिवडी), करण सिन्हा (माणदेशी फाउंडेशन),  संस्थापक /अध्यक्ष हर्षवर्धन गोडसे (अध्यक्ष, महिमानगड फाऊंडेशन), वामन जाधव (संचालक,ब्रह्माकुमारी संस्था सातारा)महिमानगड इंग्लिश स्कूलचे सर्व विद्यार्थी आणि महिमानगड न्यू इंग्लिश हायस्कूल ज्यु.कॉलेज प्राचार्या रेखा जाधव, प्रा. कोंढिबा शिंदे  आदी मान्यवर उपस्थित होते. 

      सचिन जोशी यांनी गड किल्ले संवर्धनाचे महत्व तरुण पिढीला पटवून देत महिमानगड फाऊंडेशनचे गड संवर्धनाचे कार्य उत्कृष्टरित्या सुरू असून यापुढे हे कार्य असेच सातत्याने पुढे चालू ठेवावे असे आवाहन आहे. प्रांतअधिकारी शैलेश  सूर्यवंशी यांनी फाऊंडेशन कार्यात प्रशासनाचे  पूर्ण साथ असल्याचे  आश्वासन दिले,

अक्षौहिणी बिझनेस कन्सल्टन्सी प्रा.लि. चे डायरेक्टर सिईओ अमित बोडके सर यांनी ‘उद्योजकतेतून गडसंवर्धन’ ही संकल्पना मांडली. गडाचे संवर्धन व पर्यटन विकासासाठी आवश्यक निधी उभारणी करण्यासाठी अक्षौहिणी मार्फत जे प्रॉडक्ट व सेवांची विक्री केली जाते त्यामाध्यमातून येणाऱ्या नफ्यातील वाटा हा गडसंवर्धनसाठी राखीव ठेवला जाईल व उद्योगांच्या माध्यमातून उद्योजकांनी एकत्र येऊन हे महान कार्य करण्याचे आवाहन केले.

डॉ. सौ. प्रिया शिंदे यांनी संस्थेचे गड संवर्धनाचे कार्य उत्तम प्रकारे सुरू असून या गड संवर्धन साठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर आजच्या रासायनिक युगात तरुण पिढीने स्वतःच्या कुटुंबासाठी घरगुती पद्धतीने कशा प्रकारे भाजीपाला पिकवावा याचेदेखील त्यांनी मार्गदर्शन केले.

अक्षय सोनवणे व करण सिन्हा, महिमानगड इंग्लिश स्कूलचे सर्व विद्यार्थी आणि महिमानगड न्यू इंग्लिश हायस्कूल ज्यु.कॉलेज प्राचार्या रेखा जाधव यांनी फाऊंडेशनच्या गड संवर्धन निर्मिती कार्यास शुभेच्छा देत पुढील काळात लागणारे सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

हर्षवर्धन गोडसे यांनी महिमानगड फाउंडेशनची निर्मिती कशी झाली. आजपर्यंत फाउंडेशन मार्फत केलेले सामाजिक कार्य व महिमानगड संवर्धन करण्यासाठी भविष्यातील संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट  स्पष्ट केले.

              कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे  संचालक सागर जाधव यांनी केले. प्रा. जमदाडे, प्रा. कट्टे,  प्रा. मोरे, प्रा.खंडाळे,डॉ. अजय कर्णे तसेच एन.एस.एस. विभाग दहिवडी महाविद्यालय विद्यार्थी संस्थेचे  सल्लागार  सदस्य राजेंद्र सानप, प्रा शीतल गायकवाड, सदस्य संतोष कापसे, अमोल मुळीक, सदस्य शुभम इनामदार,  सुजित कुलकर्णी, मोहिनी धर्माधिकारी , कारंडे, सुभाष पवार, फाऊंडेशन व्यवस्थापक रोहित गुरव, शुभम भोसले त्याचबरबर महिमानगड फाऊंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here