आशीर्वाद हॉस्पिटल व समर्थ मेडिकल यांचा संयुक्त उपक्रम ; जिल्ह्यातील मान्यवर राहणार जयंतीला उपस्थित.
वाठार स्टेशन : मुकुंदराज काकडे :
सातारा जिल्ह्याचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय मा. खासदार लक्ष्मणराव तात्या पाटील यांच्या जयंतीचे वाठार स्टेशन येथील आशीर्वाद हॉस्पिटल येथे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने आशीर्वाद हॉस्पिटल व समर्थ मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या शनिवार २५ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील हे असणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून फलटण कोरेगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, सुभाष नाना धुमाळ यांची उपस्थिती असणार आहे त्याचप्रमाणे मा.खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मान्यवर उपस्थित राहणार असून या निमित्ताने माऊली ब्लड बँक सातारा यांच्या माध्यमातून आशीर्वाद हॉस्पिटल व समर्थ मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन या जयंतीनिमित्त करण्यात आले आहे. आशीर्वाद हॉस्पिटल व समर्थ मेडिकल यांच्या माध्यमातून असे वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवले जातात. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉ. सुयोग लेंभे व समर्थ मेडिकलचे सुहास जाधव यांनी केले आहे.