मागिल आठ – दहा वर्षापासून फलटणची दुष्काळी तालुका म्हणुन ओळख पुसली गेलीय

0

फलटण (प्रतिनिधी)- पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या फलटण तालुक्यात मागील आठ ते दहा वर्षांपासून पाणीटंचाई जाणवलेली नाही सध्या एप्रिल महिन्यात सुद्धा कोणत्याही गावात टँकर सुरू झालेला नसला तरी भविष्यात दहा गावांमध्ये पाणीटंचाई जांविण्याची शक्यता असल्याने त्याचा संभाव्य आराखडा तयार करण्यात आलेला आहे

पूर्वी फलटण तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख निर्माण झालेली होती नीरा उजवा कालवा हा तालुक्यातून वाहत जाणारा एकमेव कालवा होता . या कालव्यावर संपूर्ण तालुका अवलंबून राहत होता. ज्या भागात पाणीटंचाईचा जाणवेल त्याला या कालव्यातून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.  मात्र या कालव्याच्या जोडीला दुष्काळपट्ट्यातून जाणारा आणखी एक धोम बलकवडी कालवा निर्माण झाला. असून या कालव्यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेत जगणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळालेला आहे. दोन्ही कालव्यांना ज्या धरणातून पाणी येते. त्या धरणामध्ये दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळे किमान एक महिना तरी तालुक्यातील कोणत्याही गावाला पाणीटंचाई जाणवणार नाही. नीरा उजव्या कालव्यावर तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना निर्माण केलेल्या होत्या. मात्र मुबलक पाणी असल्यामुळे गेल्या पाच वर्षापासून या तीनही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहेत. फलटण शहराला निरा उजवा कालव्यामार्फत पाणीपुरवठा होतो सध्या हा कालवा भरून वाहत असून नगरपालिकेने मोठा साठवण तलाव बांधलेला असून जरी कालव्यामधील पाणी संपले तरी किमान पंधरा दिवस साठवण तलावातील पाणी वापरता येते त्यामुळे पंधरा मे पर्यंत तरी शहराला पाणीटंचाई जाणवणार नाही कालव्यातील पाणी कमी होऊ लागले की नगरपालिका 33%पाणी कपात करते ही कपात करून पण शहराला पाण्याची कमतरता भासत नाही.

   साध्य एप्रिल महिन्यात अद्याप पाणीटंचाई जाणवत नसली तरी मात्र भविष्यात दहा गावात पाणी टंचाई जाणविण्याची शक्यता असल्याने त्याचा  टंचाई आराखडा प्रशासनाने तयार केलेला आहे.

त्यामध्ये 10 गावे आणि 2 वाड्या वस्त्यांसाठी 5 टँकर सज्ज ठेवण्यात आलेले आहेत तसेच 6 खाजगी विहिरीसुधा वेळप्रसंगी अधिग्रहित करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत टंचाई भासणाऱ्या गावांमध्ये प्रामुख्याने आरडगाव ,चव्हाणवाडी ,कापडगाव घाडगेमळा नांदल, जिंती, वाठार निंबाळकर, वाखरी चांभारवाडी, ताथवडा या गावांचा समावेश करण्यात आला आहे . खाजगी विहीर आणि टँकरच्या खर्चासाठी सहा लाख 50 हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे . सध्या एप्रिल महिन्यात तरी पाणीटंचाई जान वीण्याची शक्यता नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here