माण तालुक्यात पुन्हा एकदा फार्मर कप स्पर्धेचे जोरदार तुफान आलंय.

0

गोंदवले – इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो ! पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या मागच्या काही वर्षात माण तालुक्यात फार मोठी जलक्रांती झाली.यामध्ये अनेक गावातील गावकरी मंडळींनी आपसातील सारे मतभेद विसरुनी त्यांनी पावसाचे पाणी आडविणे,साठविणे आणि जिरविण्यात दमदार अशी कामगिरी केली.त्यामुळे माण तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या प्रश्न काही अंशी तरी नक्की सुटला.त्याने पाण्याच्या बाबतीत गावेच्या गावे स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली.त्यातून अनेक गावांची पाण्यासाठी होणारी मैलोमैलींची भटकंती आणि पायपीट कायमची संपली.

     हिंदी चित्रपट सृष्टीतील स्टार अभिनेते अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशने व सामाजिक आणि राजकीय चळवळीत काम करणाऱ्या काही व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्यातून माण तालुक्यातील अनेक गावे ही टँकर मुक्त होण्यासाठी फार मोठी  मदत झाली.माण तालुक्यातील अनेक गावांत जलक्रांती घडली. ती गावे आदर्शवत अशी रोल मॉडेल बनली.हजारो हातांच्या मनगटातील एकीच्या बळाच्या व सहकार्याच्या जोरावर माण तालुक्यात फार मोठे जल अभियान उभे राहिले.माणच्या मातीत पाणी क्षेत्रात एक प्रकारचा परिवर्तनशील असा नवा इतिहास रचला गेला.गेल्या काही तीन-चार वर्षांच्या पाणी फाउंडेशनच्या स्पर्धा काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून वॉटर कप स्पर्धेतील मानाचे चषक आणि लाखो रुपयांचे बक्षीस मिळविण्यात माण तालुक्यातील टाकेवाडी, शिंदी खुर्द, बिदाल व भांडवली यांसारखी गावे यशस्वी झाली.

    याने अनेक गावे पाणीदार झाली, तरीदेखील माझ्या बळीराजा शेतकऱ्यांचा वनवास आणि संघर्ष हा काही केला संपता-संपेना,असेच काही झाले आहे.शेतकरी बांधवांना अजूनही अनेक अडचणींचा सामना हा करावा लागत आहे.त्यातूनही काही शेतकऱ्यांने शेतातून चांगले उत्पादन काढलेच,तर त्याच्या शेत मालाला योग्य असा भाव  मिळत नाही.तो कवडी मोलाने विकला जात आहे.त्याने शेतकऱ्यांच्या हाती अगदी उत्पादन खर्चही मिळेनासा झाला आहे.त्यामुळे सध्या भरपूर कष्ट करूनही शेतकऱ्याच्या हाती आणि पदरी काहीच पडेना.पडते आहे ती फक्त निराशा. त्यात आधीमधी आकस्मित नैसर्गिक संकटांची भर पडतेच आहे. या सर्व आपत्तीमुळे शेतकरी राजा हतबल होत आहे.तो अगदी मेटाकुटीस आणि जेरीस आला आहे. शेतकऱ्यांची  परिस्थिती बिकट बनत आहे.

      तेव्हा आता सत्यमेव जयते फार्मर  कप स्पर्धेच्या माध्यमातून माण तालुक्यात डिजिटल आणि गट शेतीचे प्रयोग राबवून ,नैसर्गिकरित्या कीड नियंत्रण ,विषमुक्त शेती,उत्पादन वाढ आणि या उत्पादन वाढीबरोबरच उत्पादन खर्च कपातीचे तंत्रज्ञान ही विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या अर्थ व्यवस्थेचा कणा असणारा शेतकरीराजा हा मजबूत आणि सधन होण्यासाठी याने त्यांना नक्कीच मदत होणार आहे.सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून माण तालुक्यात या क्रांतीकारी समाजसेवेच्या  माध्यमातून तळा गळातपर्यंत डिजिटल आणि गट शेतीचे तंत्रज्ञान जन माणसांच्या पर्यंत पोहचविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.यामध्ये माण तालुक्यात पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धेची प्रशिक्षित टीम कार्यरत असून,त्यामध्ये प्रामुख्याने मार्गदर्शक मा.सतेशकुमार मारुती माळवे सर,पश्चिम महाराष्ट्र विभागीय समनवयक मा.आबा लाड,सातारा जिल्हा विभाग समनवयक मा.दयानंद निकम व तालुका समनवयक मा.संजय साबळे आदीं मंडळी ही आज महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावीत आहेत.ते माण तालुक्यातील शेती आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात आणि आधार देण्यासाठी पुढे सरसावले आहेत.त्यांनी शेती क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अज्ञान नाहीसे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

     माण तालुक्यात अनेक गावांमधून  शेकडोच्या संख्येत गट शेतीसाठी एका विचाराने अनेक गट निर्माण होत आहेत.सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान सुधारण्यासाठी माण तालुक्यात शेतकऱ्यांची जणू काय एक जन चळवळच उभी राहत आहे. आज शेतकऱ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी कृषी विद्यापीठातील जाणकार तज्ञ असे शेती शास्त्रज्ञ  काम करीत आहेत.फार्मर कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजामध्ये लोधवडे, पळशी,पिंपरी,बिदाल किरकसाल,धामणी,दिवड, कुळकजाई,मनकर्णवाडी,गोंदवले बु ,दानवलेवाडी,वावरहिरे अशा अनेक गावांमधून पुरुष आणि महिलांचे गटशेतीसाठीचे गट निर्माण होत आहेत.त्यांनी आपापल्या गटाचे रजिस्ट्रेशन ही सुरू केले आहे.यापुढे  अजूनही माण तालुक्यातील अनेक गावांचा सहभाग हा आणखी वाढतच आहे.यापुढेही गट शेतीचे आणखी गट निर्माण होणार आहेत. तेव्हा माण तालुक्यात सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोरदार असे तुफान येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here