अनिल वीर सातारा : येथील सूर्या बिल्डिंग, सेंट पॉल शाळेसमोर दि.१ एप्रिल रोजी सकाळी १० वा.मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदरचे शिबीर नेत्र अधिकारी विजय विठ्ठलराव निकम यांच्या पुढाकाराने आयोजित केले आहे. ते ३१ मार्च २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या समाजासाठीच्या बहुमोल कार्याचा गौरव करण्यासाठी आणि गरजू रुग्णांना नेत्रविकार उपचार व सेवा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या शिबिरात गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मे वितरण करण्यात येणार आहे.तेव्हा या समाजोपयोगी उपक्रमास सम्बधितांनी उपस्थित रहावे.शिबिराचे उद्घाटन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थीत राहून मार्गदर्शन करावे.अशी विनंती निकम यांनी केली आहे.