रघुनाथ बेंद्रे यांना बसव जीवन गौरव पुरस्कार प्रदान.     

0

सातारा/अनिल वीर: जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती नागठाणे येथे मोठ्या उत्साहात पार पडली.अध्यक्षस्थानी विजय जंगम (स्वामी) होते.

          यावेळी साहित्यिक प्रकाश काशीळकर, उपाध्यक्ष धोंडीराम विभुते, सचिव गणेश दळवी, खजिनदार गणेश बेंद्रे, सहसचिव सिद्राम पाटील, सहखजिनदार वैभव विभुते होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यावर आले. समाजामध्ये आपला नावलौकिक मिळवलेल्या सर्व समाज बांधवांचा कै बबई उत्तम दळवी यांच्या स्मरणार्थ बसव सन्मानचिन्ह आणि मेडल देऊन सत्कार करण्यात आला. समाजामध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल रघुनाथ शंकर बेंद्रे (तात्या) यांना सन २०२३-२४ चा बसव जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी साहित्यिक प्रकाश काशीळकर, लिंगायत तेली समाज नागठाणेचे अध्यक्ष युवराज बेंद्रे, जितेंद्र देशमाने आणि शिवलिंग दळवी यांच्या सह नागठाणे आणि परिसरातील सर्व लिंगायत बांधव उपस्थित होते. यावेळी तात्यांनी सर्व समाज बांधवांना विशेषता: युवक वर्गाला लिंगायत समाजाची असलेली परंपरा आणि विशेषता समजून सांगितली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनिता बेंद्रे यांनी केले. प्रस्तावना सौ. अमृता बेंद्रे व स्वागत सौ. सोनाली कदम यांनी केले. युवराज बेंद्रे यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास सर्व महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here