लाडकी बहिणी’च्या माध्यमातून धमकावत कोरेगाव-विदर्भातील आमदार मते मागताहेत : आ. बाळासाहेब पाटील 

0

सातारा : लाडकी बहीण योजनेसाठी प्रशासनाला हाताशी धरून, आपलेच कररूपातील पैसे वाटून निवडणुकीत सहकार्य करा, असे धमकावले जात आहे.
कोरेगाव व विदर्भातील आमदार असे धमकावून मते मागत असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी केला.

वाई विधानसभा राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) वतीने सुरूर (ता. वाई) येथे आयोजित महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण, आरोग्य शिबिर व विद्यार्थी गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, ”संवेदनाहीन सरकारने राजकोट येथे सागरी वाऱ्याचा विचार न करता शिवरायांचा पुतळा घाईगडबडीत उभा केला. तो पडल्यानंतर सरकारने राजीनामा न देता नौदलावर जबाबदारी ढकलली. सार्वजनिक बांधकाम विभागाने नीट देखभाल केली नाही. महिलांना स्वयंरोजगार, आरोग्य, मार्केटिंग कौशल्य, स्टॉल उपलब्धता ही कामे म्हणजे शरद पवार यांच्या संकल्पनेतील महिला सबलीकरणाचा प्रयोग आहे.”

पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी, राजकोट घटनेचे स्वत:च्या स्वार्थासाठी कोणी राजकारण करू नये’; उदयनराजेंचे आवाहन
वाई विधानसभा अध्यक्ष डॉ. नितीन सावंत म्हणाले, ”शरद पवार यांचे विचार, लोककल्याणाची भूमिका गावागावांत आम्ही पोचवत आहोत. महिला सत्तेत सहभागी झाल्याने आमूलाग्र बदल घडताहेत. स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन मिळत आहे. उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे द्यायचे आणि दुसरीकडे महागाई व गॅस, खते-बी बियाणे यांची दरवाढ करायची, अशी सरकारची मतलबी भूमिका आहे.”

पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांची शिवसेना फोडून मोठी चूक केली, त्याची किंमत त्यांना..’; संजय राऊतांचा स्पष्ट इशारा
अनिल जगताप, ॲड. विजयसिंह पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. ऋतुजा इंगवले यांनी स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष दिलीप बाबर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतीश बाबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास संतोष पवार, संग्राम कदम, संतोष शिंदे, केदार गायकवाड, सुधाकर गायकवाड, कैलास जमदाडे, शहाजी पिसाळ आदी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here