सातारा/अनिल वीर : येथील लुम्बिनी संघातर्फे देण्यात येणारे यावर्षीचे पुरस्कार संविधान लोकजागर परिषदेचे अध्यक्ष भगवान अवघडे व संघटक अनिल वीर यांना अनुक्रमे आधुनिक समाजसुधारक पुरस्कार व आदर्श आंबेडकवादी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय,जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या उपाध्यक्षा डॉ. मीनाताई इंजे यांनाही आदर्श आंबेडकरवादी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.अशी माहिती अध्यक्ष डॉ. गोरख बनसोडे यांनी दिली.
भारतीय संविधानाचे अभ्यासक भगवान अवघडे हे सातत्याने परिषदेच्या माध्यमातुन कार्यरत आहेत.ज्येष्ट पत्रकार व परिषदेचे संघटक अनिल वीर विविध क्षेत्रात कार्यरत असतात.प्रथमतः ते बुद्ध- आंबेडकर व महापुरुष यांची विचारधारा पुढे घेऊन जाताना आढळून येते.उक्ती,कृती व लिखाणातून त्यांची विचारधारा पावलोपावली आढळून येत असते. म्हणूनच त्यांना आंबेडकरवादी कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.डॉ.मीनाताई इंजे यांनीही स्वत:चा व्यवसाय सांभाळून महासभेच्या माध्यमातून कायकर्त्या म्हणून ज्येष्ट मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे हे सर्व पुरस्कार व्यक्तीचे सामाजातील स्थान व काम पाहूनच शिफारशीविना संस्थेने जाहीर केले आहेत.सदरचे पुरस्कार मान्यवरांचा हस्ते येथील यशोदा शिक्षण संस्थेच्या साधना इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये रविवार दि.२३ रोजी दुपारी १ वा.वितरण करण्यात येणार आहेत. अशीही माहिती डॉ.बनसोडे यांनी दिली.