सातारा/अनिल वीर : मिरज तालुक्यातील बेडग येथील बेडग ते मुंबई मंत्रालय लॉंगमार्चमधील भीमसैनिक अजित मोहन कांबळे व बाळाबाई मधुकर कांबळे यांची तब्येत खालवली आहे.अजित कांबळे यांना कराड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची ग्रामपंचायतीने पाडलेली स्वागत कमान पूर्ण बांधावी. या व इतर प्रमुख मागण्यासाठी आंबेडकरी समाजाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथून हा लॉन्गमार्च निघाला होता. माणगाव,आळते,तांदूळवाडी,कासेगाव या ठिकाणी पोहचला होता.कासेगावहून सातारा जिल्ह्याकडे भर उन्हात चालत असताना बाळाबाई मधुकर कांबळे यांना चक्कर आल्याने त्या रस्त्यातच बेशुद्ध पडल्या होत्या.त्यांच्यावर ताबडतोब उपचार केल्यामुळे त्यांचे तब्येत आता बरी आहे.मात्र,अजित मोहन कांबळे यांची तब्येत बिघड्लयामुळे त्यांना कराड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.