सातारा : सध्या राजकारणात नवनवीन पॅटर्न निर्माण होत आहेत.त्यामुळे अधिकचा विचार न करता आगामी निवडणुकात रिपाइं(ए)चे अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबरच जाणार असल्याचा निर्वाळा राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला.
येथील रिपाइंच्या जिल्हा कार्यालयात बंधुत्व रिपब्लिकन योद्धा दादासाहेब ओव्हाळ यांचा अभिष्टचिंतनपर सत्कार करण्यात आला.तेव्हा ते बोलत होते.यावेळी रिपाइंचे राज्य संघटक कैलास जोगदंड,सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, सातारा तालुकाध्यक्ष रामभाऊ मदाळे, विशाल भोसले,संदीप लोंढे,सनी खरात,युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे,रामभाऊ मदाळ, मदनबापू खंकाळ,पत्रकार अनिल वीर, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,एन.डी. कांबळे, नानासाहेब ओव्हाळ, अमित मोरे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर-कार्यकर्ते उपस्थित होते.
दादासाहेब ओव्हाळ म्हणाले, “सर्वत्र राजकीय पक्षात फाटा-फूट आढळून येत आहे.मात्र,आमचा पक्ष सर्वसामान्यांना पुढे घेऊन जात असल्याने एकसंघपणा आढळतो.” ठिकठिकाणी केक कापुन कार्यकर्त्यानी ओव्हाळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.