सातारा. दि 14: कु. सोमनाथ परशू वाघमारे वय 10 वर्षे 5 महिने सोनेवाडी ता. फलटण, कु. अथर्व हिरेश पाटील वय 13 वर्ष 11 महिने चर्चगेट, मुंबई, कु, कृष्णा रामसिंग चव्हाण वय 10 वर्ष 10 महिने पुसेगाव ता. खटाव, कु. प्रिया सतीश कुमठेकर वय 8 वर्ष 4 महिने त्र्यंबकेश्वर जि. नाशिक व कु. पांगी विष्णु वाघमारे वय 9 वर्षे 5 महिने सोनवडी ता. फलटण हे बाल व बालिका आढळून आल्या आहेत.
या बालकांच्या पालकांनी अथवा नातेवाईकांनी तीस दिवसाच्या आत जिल्हा परिविक्षा अनुसंरक्षण संघटना, सातारा, निरीक्षण गृह/बालगृह सातारा दूरध्वनी क्र. 8793835345, बाल कल्याण समिती, सातारा दूरध्वनी क्र. 9423193277 किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष सातारा कार्यालयाच्या 9921380135 या दूरध्वनीवर अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
दिलेल्या कालावधीमध्ये संपर्क न केल्यास बालकाचे सर्वोत्तम हित लक्षात घेता या बालकांचे पुनर्वसन केल्यावर कोणाचाही दावा राहणार नाही याची दखल घ्यावी, असे जिल्हा व बाल विकास अधिकारी व्हि.ए. तावरे यांनी कळविले आहे.