सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभा, कराड तालुकांतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.शिवाय,शहर महिला कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी कराड शहर महिला मंडळ बुधवार पेठ कार्यकारणीची निवड राजेंद्र पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये करण्यात आली. यावेळी संस्थेचे जिल्हा महासचिव भंडारे,भीमराव गायकवाड,आप्पा अडसुळे,नंदकुमार भोळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत महिला कार्यकारणीची दोन वर्षाकरिता सर्वानुमते निवडी करण्यात आल्या असून त्या पुढीलप्रमाणे आहेत. अध्यक्ष – रेशमाताई लादे, सचिव – सारिकाताई लादे, कोषाध्यक्ष – भारतीताई लादे याशिवाय,संस्कार विभाग,पर्यटन विभाग व संघटक या पदी वेगवेगळ्या महिलांच्याही निवडी करण्यात आलेल्या आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपापली मनोगत व्यक्त केली. सरनेतेय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.