शेतकर्‍यांना रात्रीऐवजी दिवसा वीज उपलब्ध करून द्या

0

खंडाळा : थंडीच्या लाटेत डिसेंबर महिन्यात शेतीसाठी रात्री वीज उपलब्ध असल्याने, शेतकर्‍यांना होणारा त्रास लक्षात घेऊन, शेतीपंपांसाठी वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करावा. शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, या मागणीचे निवेदन बावडा येथील ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी महावितरणच्या खंडाळा कार्यालयात दिले.
           या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सध्या थंडी वाढली असताना, डिसेंबर महिन्यात शेतीसाठी बनवलेले वीपुरवठ्याचे वेळापत्रक अतिशय चुकीचे आहे. थंडीमुळे शेतीला रात्री पाणी देणे शेतकर्‍यांसाठी कठीण आहे. या दिवसांमध्ये अनेक विषारी सापांचाही संचार जास्त असतो. थंडीमुळे शेतकर्‍यांच्या जीवास धोका होऊ शकतो. त्यामुळे महावितरणने शेतीपंपांच्या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून, दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी.
                 

  कडाक्याच्या थंडीत बळीराजाने रात्री काम कसे करायचे, याचा विचार महावितरणने करणे गरजेचे आहे. फक्त खंडाळ्यातच नव्हे, तर सर्वत्र हिवाळ्यात शेतीपंपांसाठी रात्रीऐवजी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात यावी.
– अतुल पवार
भाजप जिल्हा सरचिटणीस.
संबंधित वेळापत्रक वरिष्ठ स्तरावरून येते. संपूर्ण राज्यात याच पद्धतीने वेळापत्रक येते. थंडीत शेतकर्‍यांना होणारा त्रास दूर करण्यासाठी खंडाळा कार्यालय प्रयत्नशील आहे. या निवेदनाचा पाठपुरावा आम्ही वरिष्ठ कार्यालयात करू.
रणजित चांदगुडे,
कार्यकारी अभियंता, महावितरण, खंडाळा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here