सातारा/अनिल वीर : एकतर भाव न देता आमच्यावरच गुन्हे दाखल केलेले आहेत.तेव्हा सखोल चौकशी न्याय द्यावा.अशी मागणी करीत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे. अशी आग्रही मागणी ऍड.संदीप कांबळे व सागर देशपांडे यांनी केली आहे.
यासंबंधीचे वृत्त असे,बारामती किंवा इतरत्र चांगला भाव टोमॅटो कॅरेटचा रु.१५००/- च्यावर मिळत असताना बाजार समिती,फलटण यांनी २-३ दिवसांपूर्वी रु.५००/-, रु.८५०/- अशाप्रकारचे टोमॅटो व इतर भाज्यांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत लिलाव चालु होता.योग्य दर मिळत नसल्याने सुमारे १०।। वा. ऍड. कांबळे व देशपांडे यांनी बाहेर मोफत माल ग्राहकांना दिला.अशी परिस्थिती असताना जाणीवपूर्वक बाजार समितीने आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.तेव्हा सीसीटीव्ही फुटेज पाहुन खरे-खोटे जे घडलेले ते बाहेर आले पाहिजे.अर्थात, सत्य समजेल.त्यामुळे खोटे आरोप व गुन्हे दाखल करणाऱ्या व्यक्तींचे बिंग फुटेल.तेव्हा त्या सर्व संबंधितावर योग्य कारवाई करावी.बिहार पॅटर्न येतोय की काय ? असाही सवाल ऍड. कांबळे व देशपांडे यांनी केली आहे.लाखो खर्च उत्पादनास करूनही बाजार भाव मिळत नसल्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न देशपांडे यांनी केला होता.