सातारा : संगीत हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे.संगीत म्हणजे जीवन.संगीत सर्वानाच आपलेसे करून टाकतात.असे प्रतिपादन कविवर्य इंद्रजीत भालेराव यांनी केले.
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व कराओंके सिंगर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शाम-ए -गझल हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा कविवर्य भालेराव यांनी सदिच्छा भेट दिली. तेव्हा ते बोलत होते.यावेळी नरेंद्र पाटील, डॉ.शशिकांत पवार, सागर पावशे, शिरीष चिटणीस, सुनील राठी, राजेंद्र शेजवळ, अनिल वीर, विजय साबळे, विनायक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
“शास्त्रीय संगीत किंवा सुगम संगीत असो हे संगीताचे धन आहे.तेव्हा पुढील पिढीपर्यंत कसे पोहोचेल? त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे” असे आवाहनही भालेराव यांनी केले. ते पुढे म्हणाले,”गझल गाणाऱ्यांमध्ये अमीर खुसरो,मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी यासारख्या गझल गायकांनी अनेक अजरामर गझल गायल्या असून आजही त्या आपण ऐकत आहोत. त्या काळातील गीतांवर प्रेम करणारी श्रोते आहोत. आजच्या पिढीमध्ये एकापेक्षा एक नवीन गायक आहेत. ते संगीत क्षेत्रात भर टाकत आहेत. परंतु, जुन्या गीतांची तोडीची गीते सादर होत नाहीत .तीच गीते गायनाची लय व पद्धत बदलून ऐकवली जातात.
शिरीष चिटणीस म्हणाले, “संगीताचे खूप महत्त्व असून संगीत हे जीवनाला दिशा देऊन दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करण्याचे प्रभावी माध्यम आहे. सातारा पॅटर्न म्हणून नावाजलेला ग्रंथ महोत्सवात कराओंके सिंगर्स क्लबला गायनाची संधी देण्यात आली आहे.” विजय साबळे यांनी सातारच्या बाथरूम सिंगरना सिंगर केले. असे गौरवोद्गारही चिटणीस यांनी काढले.
डॉ. शशिकांत पवार म्हणाले, “संगीत म्हणजे काय ? ते कुठून आले ? यामध्ये वेद, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद, यासारख्या वेदांची पाच हजार वर्षांपासूनची संगीताला परंपरा आहे. संगीतामध्ये अनेक राग आहेत.ते राग दिशांच्या मार्फतही निर्माण झाले आहेत.”
अनिल वीर म्हणाले, “शाम-ए- गजल यासारखे प्रोग्राम संस्था आयोजित करत असून त्यातून समस्त सातारकर रसिक श्रोत्यांना गीताची एक पर्वणी दिली जात आहे. कराओंके संगीतामुळे समाजात नवीन गायक कलाकार घडला जात आहे.त्यामुळेच हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे.” वि.ना.लांडगे म्हणाले,
“शहरांमधील सर्व महत्वपूर्ण कार्यक्रम सभागृहात पार पडत असून त्यातून समाजाला एक दिशा दिली जात असून त्यामुळेच कलाकार निर्माण होत आहेत.”
“शाम-ए -गझल” या हिंदी गीतांच्या सुश्राव्य गीत मैफिल उत्तरोत्तर रंगतदार झाल्या. डॉ. सुनील पटवर्धन यांची, “रंजिश ही सही” याशिवाय,सचिन शेरकर यांची ” सीने मे जलन आखो मे तुफान ” सुधीर चव्हाण यांची “होटो से छू लो तुम” मंजुषा पोतनीसने, “यु हसरतो के दाग” स्मिता शेरकरने “बहारो मेरा जीवन सवरो” कविता शिवकुमार यांनी ” ये दिल और उनकी निगाहो की साये” बोकीलने,”वो तेरे प्यार का गम।” यासारख्या गजलांना रसिक श्रोत्यांच्या पसंतीची पावती मिळाली.यानंतर बापूलाल सुतार यांच्या,”भरी दुनिया ओंके दिल को समझाने कहा जाये ” या गीताला रसिक श्रोत्यांचा वन्स मोअर मिळाला. डॉ. राजेश जोशी यांनी,”तुमको देखा तो हे खयला आया ।” नीलम कुलकर्णीने, “सलोना सा सजन है।” विजय साबळे यांच्या ” जिक्र होता है जब कयामत का” यासारखे गीतांनी कार्यक्रम एका उंची गेला होता. सुप्रिया चव्हाण यांनी, “ना तुम बेवफा हो।” शिवकुमारने,”छू लेने दो नाजूक होटो को…. ” आग्नेश शिंदे यांच्या,”तुम इतना जो मुस्कुरा रहे हो।” दिपाली घाडगेने “चिट्ठी ना कोई संदेश” यासारख्या गजलांनी रसिक श्रोते अक्षरशः भारावून गेले होते.तदनंतर डॉ. सुनील पटवर्धन यांच्या “शामे गम की कसम” सुनील शेरकरने, “कभी खुद पे कभी हालात पे रोना आया।” मंजुषा पोतनीसने, “रसमे उलफत को निभाये तो कैसे?” स्मिता शेरकरने “अगर मुझसे मोहब्बत है।” नीलम कुलकर्णीने “धुवा भी है जवा” बाबूलाल सुतारने ” रंग औ नूर की बारात किसे पेश करू?” यासारख्या गाजलने गझलांनी रसिक-श्रोत्यांनी दाद दिली.विजय साबळे यांच्या,”आपके हसीन रूप पे… ” या सुंदर गझलने समारोप झाला.सदरच्या कार्यक्रमास विकास साबळे, युनूस,शहाबुद्दीन शेख,धीरेंद्र राजपुरोहित,प्रकाश सावंत, विकास साबळे,लक्ष्मीकांत अघोर, प्रिया अघोर, सुनील भोजने,,ज्योत्सना खुटाळे, विजया कदम,आर.डी.पाटील, गौतम भोसले, जगदीश खंडागळे सचिन शिंदे, विनोद कामतेकर, प्रवीण सपकाळ,अनिल मसुरकर, शुभम बल्लाळ आदी उपस्थित होते.