संविधान भक्कम असले तरीही प्रशासनात जाणे गरजेचे : रमेश इंजे

0
फोटो : बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करताना मान्यवर.

सातारा : सत्तेत जाता येत नसेल तर प्रशासनात उच्च पदस्थ म्हणून जाणे गरजेचे आहे. तरच भक्कम असणाऱ्या संविधानास बळकटी मिळू शकते. असे आवाहन इंजि. रमेश इंजे यांनी केले.

                 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वंदनेनंतर संविधान या विषयांवर रमेश इंजे मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे होते.इंजे म्हणाले, “विरोधक सर्व पातळीवर संविधानविरोधी कट-कारस्थान करीत आहेत.तेव्हा सर्व संविधानप्रेमींनी एकत्र येऊन संविधानाधारीत बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारानुसारच संकुचितपणा बाजूला ठेवुन कार्यरत राहिले पाहिजे.प्रत्येकांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपले ज्ञान अद्यावत केले पाहिजे.शिवाय,आपल्याजवळ प्रबोधनात्मक असलेले ज्ञान इतरांना दिले पाहिजे.कोणत्याही ठिकाणी चर्चा करताना स्वतःमधील न्यूनगंड बाजूला ठेवला पाहिजे.”

    संविधान लोकजागर परिषदेचे अध्यक्ष भगवान अवघडे म्हणाले, “संविधान प्रेमींच्यावतीने प्रजासत्ताक दिनी संविधान आधारित पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य व फिल्म शो आयोजीत करण्यात आलेला आहे.” प्रकाश सावंत म्हणाले,”एखाद्या घटनेबाबत जागेवरच सडेतोड उत्तर दिले पाहिजे.तरच नकारात्मक गोष्टींवर चर्चा होत नाही.” अमर गायकवाड म्हणाले, “सुवर्णमहोत्सवी पँथरचे वर्ष असल्याने पुस्तिकेसाठी अजून कोणास लेख द्यायचे असतील तर लवकरात लवकर द्यावेत.”

       यावेळी अनेक विषयांवर चर्चा विनिमय करण्यात आला. प्रामुख्याने,समाजाच्या हितार्थ कृतीयुक्त कार्यवाही करावी. अर्थात,अर्थाचा अनर्थ कोण्हीही करून काट्याकुट करू नये. मोकळं मन हे सैतानाचे घर असते.तेव्हा प्रत्येकांनी चांगल्या कामात व्यग्र असले पाहिजे. दोन/त्यापेक्षा अधिकचे एकत्रीत येऊन चर्चा करतात.त्यास समाज म्हणतात.मात्र,स्वतःचे विचार दुसऱ्यावर लादता कामा नये. सर्वांचे ऐकूनच निष्कर्ष काढावा. खाजगीत टीकाटिप्पणी करू नये. सार्वजनिक ठिकाणी शंकाचे निरसन केले जावे.मीपण गळून जात असतो.प्रत्येकजण आपल्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ असेल.मात्र, त्यास समाजात सारखीच किंमत असते.प्रजासत्ताक दिनी जकातवाडी येथील गृहप्रवेश कार्यक्रमास दिवसभरात आपापल्या वेळेनुसार जाण्याचे ठरलेले आहे.(अधिक माहितीसाठी शामराव बनसोडे यांच्याशी संपर्क साधावा.) तरीही दि.२६ रोजी सकाळी १०।। पुतळा परिसर,११ वा.राजवाडा व दुपारी १२ ते ४ यावेळेत जकातवाडी.असे अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा-विनिमय करण्यात आला. युवा शाहिर सत्यवान गायकवाड यांनी प्रास्ताविकपर भीमा तुझ्या जन्मामुळे ….हे गीत सादर केले.भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन प्रमुख दिलीप फणसे यांनी आभारप्रदर्शन केले. प्रारंभी, सत्यवान गायकवाड व दिलीप फणसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सामुदायिक वंदना घेण्यात आली.

          सदरच्या कार्यक्रमास भन्ते दिंपकर, चंद्रकांत खंडाईत, ऍड.हौसेराव धुमाळ, विलास कांबळे, मुरलीधर खरात,तुकाराम गायकवाड, ऍड.विलास वहागावकर, पी.टी.कांबळे,संजय नितनवरे, विजय जे.गायकवाड, अनिल वीर,अशोक भोसले, भोसले सर, अशोक बनसोडे, डॉ.आदिनाथ माळगे,उपासिका – उपासक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here