सम्राट अशोकने बुद्ध धम्म व संघाची शिकवण दिली : डॉ.अरुण सोनकांबळे

0

सातारा : बुद्धांच्या शांतीचा मार्ग अवगत करून सम्राट अशोक यांनी क्रांतीचा मार्ग दाखवला आहे.सम्राटांनीच खऱ्या अर्थाने बुद्ध,धम्म व संघाची शिकवण दिली आहे.असे प्रतिपादन प्रा. डॉ.अरुण सोनकांबळे यांनी केले.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे येथील पुतळा परिसरात सांस्कृतिक सभागृहात अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा सम्राट अशोक यांच्या जयंतीचे औचित्य साधून “चक्रवर्ती सम्राट आशोक आणी अखंड भारत” या विषयावर प्रा.डॉ.अरूण अशोक सोनकांबळे मार्गदर्शन करीत होते.

              डॉ.सोनकांबळे म्हणाले, “इतिहास सर्व क्षेत्रातील व्यवस्थित लिहिला नाही.जी सांस्कृतीक मिरासदारी ती संपविण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे.तरच समता मुलक समाज निर्माण होणार आहे.धम्म हा विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. प्रथमतः धम्म मजबूत झाला पाहिजे.तदनंतर समाज व सरतेशेवटी राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी साह्य होईल.अर्थात,सामाजिक एकतेशिवाय राजकीय सत्ता मिळणार नाही. इतिहासाचा ठेकेदार व डॉ.आंबेडकर यांचे नेतृत्व आतापर्यंत झाले नाही. संहिता ही धम्माबरोबरच सर्वत्र मानवाने राखली पाहिजे. महापुरुषांचे ज्ञानरुपी विचार मन-हृदयात असले पाहिजे. बहुजनांना सतराशे साठ राजकीय पार्ट्या आहेत.त्यामुळेच यश मिळत नाही.साडे अकरा कोटीपैकी दीड कोटी जनतेची ताकद एकवटली पाहिजे.इतिहास आपल्या पिढीला सांगितला पाहिजे.”  कवी यशवंत मनोहर यांच्या कवितेचा आशय सांगून डॉ.सोनकांबळे यांनी व्याख्यानाची सांगता केली.

  अध्यक्षस्थानावरून बोलताना चंद्रकांत खंडाईत म्हणाले,”दि प्रॉब्लेम ऑफ रुपी या आर्थिक विचार ग्रंथावर वर्षभर कार्यक्रमासह प्रबोधनात्मक विचारही जयंती-स्मृतिदिन व अन्य कार्यक्रमातून समितीमार्फत राबविण्यात येणार आहेत.”

    प्रारंभी डॉ.सोनकांबळे,खंडाईत आप्पा,दादासाहेब केंगार, बी.एल.माने आदी मान्यवरांनी डॉ.आंबेडकर पुतळा व सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बी.एल.माने यांनी प्रास्ताविक केले.संजय नितनवरे यांनी सूत्रसंचालन केले तर ऍड. विलास वहागावकर यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास डॉ.प्रा. विलास खंडाईत,ऍड. हौसेराव धुमाळ, रमेश इंजे,गणेश कारंडे, विशाल भोसले, शामराव बनसोडे,अनिल वीर,द्राक्षा खंडकर, सुनील निकाळजे, डी. एस.भोसले,जे.डी. कांबळे, सुधाकर काकडे,तुकाराम गायकवाड,श्रीरंग वाघमारे,रमेश गायकवाड,गंगावणे आदी पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर-कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here