सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांच्या मातोश्री सरुबाई वामनराव गावकवाड यांचे ८५ व्या वर्षी पसरणी,ता. वाई येथील राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात ४ मुले,सुना,२ मुली,जावई व नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या अंत्यदर्शनास रिपब्लिकन आठवले गटाचे मातंग आघाडीचे अध्यक्ष आण्णा वायदंडे,सातारा तालुकाध्यक्ष आप्पा तुपे व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते,रिपब्लिकन सेनेचे प.विभागीय अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,संघटक गणेश कारंडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे उपाध्यक्ष विलास वहागावकर, बाळासाहेब सावंत,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर आदी उपासक-उपासिका उपस्थित होत्या.