सातारा/अनिल वीर : ग्रंथमहोत्सवाचा पॅटर्न राज्यास आदर्शवत असून त्याचा दूरवर बोलबालाही आहे.यावर्षीचा २२ वा ग्रंथमहोत्सवाचे सूप एखदाचे वाजले. येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर शंकर सारडा नगरीत चालु असलेला ग्रंथमहोत्सव वैविधतेने नटलेला होता. साहित्यिक व वाचकांना पर्वणीच होती.खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता समारोह मोठ्या उत्साहात झाला.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, “मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी संसदेत आपण प्रयत्न केलेला आहे.अंतिम निर्णयापर्यंत लढत राहु.कर्नाटकमधील बेळगाव,कारवार,निपणीसह जी गावे महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानाही मराठीबाबतचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील राहू.” याच आशयाच्या संदर्भात कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा.शिवाय, सीमावाद मिटविण्याबाबतचा ठराव जाहीर करुन ग्रंथमहोत्सवाचे महत्वपुर्ण असे २ ठराव मांडले होते.त्यावर खा.पाटील यांनी खुलासा केला.
यावेळी अध्यक्ष प्राचार्य यशवंतराव पाटणे यांनी प्रास्ताविकपर अभ्यासपूर्ण अशी माहिती कथन केली.यावेळी कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, डॉ. राजेंद्र माने,डॉ.संदीप श्रोत्री,वि. ना.लांडगे, साहेबराव होळ, सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.सुनीता कदम यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.४ दिवस चाललेल्या ग्रंथमहोत्सवाच्या काळात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.त्यात शिक्षण क्षेत्रातील दिनकर पाटील व राजेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.तसेच पत्रकार क्षेत्रातील विनोद कुलकर्णी व हरीश पाटणे यांनीही मराठीला अभिजात दर्जा मिळावा ? याबाबत अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.
उल्हासदादा पवार म्हणाले, “राष्ट्रीय राजकारणात शरद पवार,नितीन गडकरी यांच्या दबदबा आहे. ना.गडकरी यांचे काम चांगले आहे.त्यांचा दबदबा असूनही दिसत नाही.तेव्हा मराठी भाषा/महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वानी मतभेद विसरून एक आले पाहिजे. मानसिक व सामाजिक इछाशक्ती असेल तर हक्क मिळविता येईल.”