साताऱ्यात फुलांचे भाव गेले गगनाला

0

सातारा : गौरी गणपतीचा सण म्हणले की सर्वच आबाला होताना एक वेगळाच उत्साह येतो. उत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रमात पूजेसाठी फुलांनाही तितकेच महत्त्व दिले जाते. गौरी आणि गणपतीसाठी लागणारी विविध सुवासिक तसेच देश-विदेशातील रंगबिरंगी फुलांचे भाव मात्र या उत्सवामुळे गगनाला भेटले आहेत.
सातारा शहरातील राजवाडा परिसरात मोती चौक ते राजवाडा दरम्यानच्या फुटपात वर सध्या फुलवेक्रेत्यांची गर्दी होत आहे.

करंजे पेठेतील बाळू वाघ यांच्या या फुलाच्या दुकानांमध्ये सध्या बेंगलोर गुलाब, शेवंती, जांभळी शेवंती, लाल बेंगलोर गुलाबाला विशेष मागणी आहे. ऑस्टर या गुलाबी रंगांच्या फुलांनाही तितकीच मागणी असून सध्या या फुलांचे भाव आठशे रुपये प्रति किलो इतकेच चढे आहेत. मात्र, तरीही नागरिकांना घरोघरी पूजेसाठी तसेच हार बनवण्यासाठी या फुलांना विशेष प्राधान्य दिले जात. गोल्डन येलो आणि गोल्डन ऑरेंज जातीचे झेंडू फुले ही सध्या तीनशे रुपये किलो दराने विकली जात आहे.

सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये हार बनवण्याला वेळ नसल्यामुळे तयार हार खरेदीसाठीही विशेष गर्दी होत आहे.
निशिगंधांच्या फुलाचा भाव हजार रुपये प्रति किलो गेल्यामुळे लाल गुलाब, झेंडू तसेच शेवंतीच्या फुलांना व त्यापासून बनवलेल्या हारांना विशेष मागणी आहे. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी तसेच गणपतीसाठी तीन दिवस या हारांना विशेष मागणी असते. मंगळवारी या गौरींचे आगमन झाले असून बुधवारी महाभोजन आणि गुरुवारी घरच्या गणपतीचे या गौरी सोबत विसर्जनही होणार आहे. त्यामुळे सुवासिक सायली आणि कुंदा फुलांच्या गजऱ्यांनाही विशेष मागणी आहे. सध्या हे गजरे तीस ते पन्नास रुपये प्रति नगाने विकले जात आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here