साताऱ्यात मणिपूर प्रकरणाबाबत भव्य मोर्चा संपन्न

0

सातारा/अनिल वीर : पोलीस प्रशासन करा… संविधानाचे रक्षण,जुलूम के साये मे मुह खोलेगा कौन ?  भारत की नारी है,फुल नही चिंगरी है। देश म्हणजे देशातील माणसं अशा आशयाच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.देशातील स्त्रियांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रीयता जागर अभियानतर्फे भव्य मोर्चा साताऱ्यात काढण्यात आला होता.

      सहवेदना फेरी ही गांधी मैदान ( राजवाडा) येथुन निघुन कर्मवीर भाऊराव पाटील पथमार्गे छ. शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी काढण्यात आली.यावेळी सर्व कार्यकर्ते,पदाधीकारी, महीला –  पुरूष,युवक-युवती व सर्वच स्तरांतील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.विशेष म्हणजे मोर्चा अगोदर पावसाचे वातावरण असतानाही मोर्चा निघताच पावसाने दडी मारल्याने निसर्गानेही साथ दिली होती. महिलांच्या हातात मोर्चाची सूत्रे आपसुकच हातात आली होती. सुरवातीला महिला-युवती रांगेत होत्या.तदनंतर इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येनी घोषणांत सहभागी झाले होते.पोलीस मुख्यालयात निवेदन  दिल्यानंतर जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडे मोर्चा रवाना झाला.तेव्हा अनेकांनी केंद्र व मणिपूर सरकार विरुद्ध आपापल्या भाषणातून फटकेबाजी केली. सरतेशेवटी जिल्हाधिकारी कार्यालयातही निवेदन सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here