सातारा/अनिल वीर : येथील शनिवार चौकामध्ये शहिद भगतसिंग मित्र मंडळाचे कार्यकर्ते कुमार सफदर सय्यद यांना सापडलेले पाकीट परत केले आहे.
सापडलेल्या पाकिटात रोख रक्कम रु.२,५००/-,एटीएम कार्ड, आधार कार्ड,लायसन्स आदी कार्ड होते.पत्त्यावरून भिमराव पाडूरंग थोरात (रा.१०, श्रीनगर सोसायटी कृष्णानगर) या ठिकाणी समक्ष जाऊन परत दिले.याबद्धल थोरात परीवाराने सफदरचे अभार व्यक्त केले.त्यांना स्वखुशीने रु.२००/- चे रोख रक्कमेची भेट देऊन आशीर्वाद दिले.