सातारा : सर्वधर्मसमभाव राखत समाजातील सर्व घटकांनी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन दूध संघाचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी केले. केरळ,ता.पाटण येथील ज्येष्ट सामाजीक कार्यकर्ते खाशाबा किसन कांबळे (आबा) यांच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमात आदरांजलीपर सुभाष पवार बोलत होते.अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे शाखाध्यक्ष अनिल कांबळे होते.
सुभाष पवार म्हणाले, “आबा यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.वडीलकीचा आधार होता. सांस्कृतिक,सामाजिक आदी क्षेत्रात आबांचे हरहुन्नरी कार्य होते.मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असुन समाजात पोकळी निर्माण झाली आहे.”
जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव बंधुत्व धम्मरत्न मिलिंद कांबळे म्हणाले,”घर व सामाजिक पायाभरणी आबांनी भक्कमपणे केली होती.तेव्हा त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श तालुक्याने घ्यावा.तरच सर्वांगसुंदर समाज निर्माण होईल.” तालुकाध्यक्ष आनंदा गुजर म्हणाले, “धार्मिक, सामाजिक आदी क्षेत्रात काम करण्याची मुहूर्तमेढ आबांच्या घरातूनच होत असे.” साहेबराव अडसुळे म्हणाले, आबांनी घरपण दिल्याने मुंबईकरांची सर्व व्यवस्था होत असे.” पिराजी जाधव म्हणाले, “घरं पक्की झाली असली तरी विचार कच्चे राहिले आहेत.तेव्हा संस्कारक्षम पिढी थोरामोठयांच्या माध्यमातूनच घडत असतात.”
अनिल वीर म्हणाले,”सर्व क्षेत्रात आबांनी हिरीरीने कार्य करून आपल्या दिलदार स्वभावाची छाप समाजपटलावर पाडली होती.बँड पथकात त्यांचा सिंहाचा वाटा होता.त्यांनी धार्मिक,सामाजिक,राजकीय आदी क्षेत्रात भरीव असे काम केलेले आहे.त्यामुळे त्यांच्या आदर्श घेऊन समाजात चांगुलपणा राखावा.” यावेळी शंकर पवार,राजेंद्र सत्वधीर, नंदकुमार गवळी,आनंदा भोळे, बजरंग डूबल (अडुळ),डूबल (दिवशी), रुपेश लादे,यशवंत कांबळे,दीपक घाडगे व सावंत यांनी आबांच्या जीवानचरित्रावर प्रकाशझोत टाकला.
सदरच्या कार्यक्रमास बाबुराव सत्वधीर,सुनील वीर (आप्पा), दिलीप देसाई, गुलाब अडसुळे, सखाराम कांबळे,अशोक न्यायधीश,कैलास चव्हाण,सुशांत कांबळे, बुवा कांबळे,विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते, उपासक-उपासिका,संपूर्ण कांबळे,अडसूळे व न्यायाधीश परिवार उपस्थीत होते.