सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचे युवा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड (भाई) यांनी ब्लॅक स्टोन क्रेशर प्रकरणी एकसर, व्याहळी, कुसगाव या गावातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठविला होता. यामुळे ब्लॅक स्टोन क्रेशर च्या बोगस परवानगी, आणि कमी जास्त पट्टा प्रकरणाची पोलखल झाली होती ब्लॅक स्टोन क्रेशर बंद पडला. याच मुळे स्टोन क्रेशर मालकाची आग पाखड झाली होती. त्यामुळे मालकाने स्वप्निल भाई गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
कुसगाव, व्याहळी, एकसर, या तीन गावातील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषदेतून ब्लॅक स्टोन क्रेशर मालकाने केलेला दावा खोडून काढला आहे. ग्रामीण भागातील जनसामान्यांसाठी खरे नेतृत्व असल्याचे मत मांडले आहे. सोबतच ग्रामस्थांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभा करण्याचे काम स्वप्निल भाई गायकवाड यांनी केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या लढ्यामुळेच धन दांडगे असणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत असणारे यांच्या विरोधात लढण्याची ताकद मिळाली आहे. असे म्हणणे गावकऱ्यांनी मांडले आहे. स्वप्निल भाई गायकवाड यांच्या निस्वार्थी धोरणामुळे त्यांचे नेतृत्व या गावकऱ्यांनी स्वीकारले आहे. असे मत उपस्थितांनी व्यक्त केले आहे.
स्वप्निल भाई गायकवाड यांच्या मार्गदर्शक लढ्यामुळे निसर्गाचा ऱ्हास स्थानिकांचे नुकसान धन दांडग्यांना चपराक बसू शकणार आहे चार वेळा निवडून दिलेला आमदार सुद्धा या प्रकरणाबाबत फिरकला नाही यामुळे तिने गावातील ग्रामस्थ नाराज असल्याचे दिसून आले
त्यामुळे या गावकऱ्यांनी यांच्या नेतृत्वात लढा सुरू केला असल्याची माहिती दिली आहे सोबतच स्टोन क्रेशर मालकाला सदबुद्धी देवो अशी प्रार्थना उपस्थित ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आर्थिक हव्यासापोटी स्टोन क्रेशर मालक बिनबुडाचे आरोप करून आंदोलन दाबण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहेत सोबतच बिनबुडाचे आरोप करून बदनामी करून आपला व्यवसाय सुरू होईल या हव्यासापोटी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेत आहेत त्यामुळे या गावकऱ्यांनी वाईच्या महागणपतीला साकडे घातले आहे की मालकाला सदबुद्धी देवो