भटक्यांच्या पालावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0

जामखेड तालुका प्रतिनिधी – देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष झाले पण इथल्या आदिवासी भटक्यांना ७८ वर्षा नंतर या समाजाला राहायला फुटबर जागा नाही घर नाही जमीन नाही. व आभाळ पांगरणे ही अवस्था असलेल्या समाजाला आज कुठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळू लागले. भटके विमुक्त लिहू लागले बोलू लागले त्यांच्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरा बद्दल सन्मान वाढत आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचेही आहेत. याची जाणीव होत आहे ही खूप मोठी बाब आहे त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आम्हाला जगण्याचा अधिकार मिळाला माणूस पण मिळाले. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ.अरुण जाधव यांनी केले. त्याचबरोबर पहिल्यांदाच जामखेड शहरांमध्ये भटक्यांच्या पालावर जयंती साजरी होत असल्यामुळे पालातील सर्व भटके मुक्तांना खूप आनंद वाटू लागला मुला बाळासह सर्व परिवार बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे आज आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळे पालातील एकही भटक्यातील व्यक्ती कामासाठी गेला नाही भीक मागण्यासाठी गेला नाही. हे आजच्या जयंती चे वैशिष्ट्य मानावे लागेल. असे प्रतिपादन ॲड. जाधव यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या या विशेष कार्यक्रमास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील उपस्थित होते. ते पुढे बोलताना म्हणाले की मला आनंद होतोय की पहिल्यांदाच एका भटक्यांच्या पालावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंती साठी उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली त्याचा मला अभिमान वाटतो. आणि गर्व वाटतो .

या जयंती सोहळ्यासाठी ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापू ओहोळ बोलताना म्हणाले की बाबासाहेबांनी संविधान दिले नसते तर इथल्या भटके विमुक्त आदिवासी यांची अवस्था काय असते. संविधानामुळेच पालात का असेना आम्ही तुटके फुटके साध्या पद्धतीने जीवन जगत आहोत याची जाणीव भटके विमुक्ताण होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि त्यांच्या संविधानामुळे आज प्रत्येक आदिवासी असो की भटक्या विमुक्त असो या सर्वांना माणूस म्हणून जगण्याची हिंमत मिळालेली आहे. या जयंतीच्या निमित्ताने भटक्यांच्या पालावर आनंदाचे वातावरण ओसंडून वाहत होतं हेच आजच्या जयंतीच्या फलित म्हणावं लागेल.

या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण विकास केंद्र चे राजू शिंदे, यांनी केले यावेळी जयंती साठी उपस्थित. सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र जाधव, संतोष पवार, अरविंद पवार, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, धनराज पवार, शिवनेरी अकॅडमीचे लक्ष्मण भोरे  आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here