शाहिर संभाजी भगत यांचा २१ एप्रिल रोजी भीमगीतांचा जलसा

0

कोपरगाव प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज घडावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव येथील सामाजीक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या 12 वर्षांपासून समाजहिताचे उपक्रम राबविले जात असतात.  सालाबाद प्रमाणे याहीवर्षी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने भीम जन्मोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले असून . या निमित्ताने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विद्रोही आंबेडकरी जलसाकार, भीमशाहिर संभाजी भगत यांचा प्रबोधनात्मक भीमगीतां भव्य कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी सात वाजता शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन यांनी दिली . 

बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने कायमच समाजहिताचे उपक्रम राबविले जातात. सदर संघटनेच्या मार्फत सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहात डी जे मिरवणूक याला फाटा देत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करत साजऱ्या करण्यात येत असतात. बुद्धिस्ट यंग फोर्स या संघटनेने हा आगळा वेगळा पायंडा पाडत सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 

भीमशाहिर संभाजी भगत यांच्या प्रबोधनात्मक भीमगीतांच्या  कार्यक्रमाला कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन, जेष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे, कार्याध्यक्ष राजेंद्र उशीरे,  खजिनदार संजय दुशिंग, प्रसिद्धी प्रमुख अरूण त्रिभुवन, प्रदीप आहिरे, भानुदास त्रिभुवन,भारत सदर,सचिन पगारे,सुनिल वाव्हुळकर,अमोल आहिरे, शंकर बिऱ्हाडे, भीमराज गंगावणे, रवी धिवर, संतोष कोळगे,किरण कसारे, गौतम गायकवाड अजय उशीरे, प्रशांत कोपरे, राजेंद्र त्रिभुवन आदींसह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, भीमसैनिक उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here