Athiya Shetty and KL Rahul names daughter Evaarah know the meaning

0


भारतीय क्रिकेटर के एल राहुल (KL Rahul) आणि आथिया शेट्टी (Athiya Shetty)  यांच्या घरी मार्चमध्ये छोट्या पाहुण्याचं आहमन झालं होतं. शुक्रवारी दोघांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. तसंच यावेळी त्यांनी आपल्या मुलीच्या नावाचीही घोषणा केला आहे. अथिया आणि राहुलने फोटोमध्ये त्यांच्या बाळाचा चेहरा उघड केलेला नाही.

फोटोमध्ये के एल राहुल आणि आथिया आपल्या बाळासह दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आमची मुलगी, आमचे सर्व काही.  Evaarah / इवारा – देवाची भेट”. इवारा हा शब्द संस्कृतमधून आला असून याचा अर्थ देवाची भेट असा आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा, समांथा रुथ प्रभू यांनी कमेंटमध्ये हार्ट इमोजी शेअर केली आहे. 

अथिया आणि राहुल यांनी 24 मार्च रोजी त्यांच्या मुलीचे स्वागत केलं आणि इंस्टाग्राम पोस्टद्वारे याची घोषणा केली. मुलीच्या जन्माच्या काही महिनेआधी नोव्हेंबरमध्ये त्यांनी गर्भधारणेची घोषणा केली होती. मुलीच्या जन्माच्या काही दिवस आधी, त्यांनी त्यांच्या प्रेग्नन्सी फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले होते. 

अलीकडेच, ETimes शी गप्पा मारताना, सुनील शेट्टीने सांगितलं होतं की, आपल्या मुलीच्या बाळाचं आजोबा होणे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा उत्साह आहे. आपल्या नातवासह खेळता यावं यासाठी आपण रोज न चुकता व्यायाम करत असल्याचंही त्याने सांगितलं होतं. 

राहुल सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे. मुलीच्या जन्मामुळे लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या मोसमातील सलामीचा सामना त्याने गमावला होता. विशाखापट्टणम येथून उड्डाण केल्यानंतर काही तासांनी त्यांनी इवाराहचे स्वागत केले.

कॉस्मोपॉलिटनसोबतच्या आधीच्या चॅटमध्ये अथियाने राहुलसोबतच्या तिच्या नातेसंबंधाबद्दल सांगितले आणि म्हणाली, “आमची व्यक्तिमत्त्वे खूप वेगळी आहेत आणि त्यामुळेच समतोल राखला जातो. तथापि, आमची मूल्य प्रणाली खूप सारखीच आहे आणि त्यामुळेच आम्ही एकमेकांशी जोडलेलो आहोत. असे काही दिवस आहेत जेव्हा माझ्यात एका विशिष्ट प्रकारची भावना असते, पण ते मांडण्याची किंवा व्यक्त करण्याची करण्याची उर्जा नसते. पण तरी राहुलला मी कशातून जात आहे हे चांगले समजते. हेच त्याच्याबद्दल विशेष आहे”. राहुल आणि अथियाचे जानेवारी 2023 मध्ये लग्न झालं.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here