MI vs SRH: आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये एकामागून एक धमाकेदार डाव रंगत आहेत. पण गोलंदाजांच्या पाठीत ठप्प देणारा डाव खेळाला म्हणजे अभिषेक शर्माचा डाव. त्याने एका डाव 141 धावांची खेळी खेळली. या शतकानंतर अभिषेकने चिट दाखवून सेलिब्रेशन केलं. आता त्या चिटची दहशत इतकी आहे की अभिषेकची झाडा-झडती लाईव्ह मॅच दरम्यानच सुरू झाली. ही झाडा-झडती सूर्यकुमार यादवने केली. त्या सामन्यात हैदराबादला वानखेडेवर मुंबईविरुद्ध 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पण अभिषेकची भीती स्पष्ट दिसत होती.
सूर्या अभिषेकची तपासणी करतो
वानखेडे मैदानावर हैदराबादकडून खेळणारा अभिषेक शर्मा उत्तम लयीत दिसत होता. दरम्यान, अचानकचं सूर्यकुमार यादवने त्यांना तपासायला सुरुवात केली. झाडा-झडती करत सूर्याने अभिषेकच्या दोन्ही खिशात हात घालून चिठ्ठी शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काहीही सापडले नाही. या सामन्यात अभिषेक शर्माने 40 धावांची जबरदस्त खेळी केली आणि संघाची धावसंख्या 162 पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हे ही वाचा: आधी लाल गुलाबाच्या पुष्पगुच्छा सोबत स्टोरी टाकली अन् नंतर…युजवेंद्र चहलच्या रहस्यमय पोस्टने उडाली खळबळ
#MIvSRH
Sky was checking abhishek pocket pic.twitter.com/2r9pmCEZ2w— Rahul (@BizNitiRahul) April 17, 2025
हे ही वाचा: झहीर खान आणि सागरिकाच्या घरी झाले छोट्या पाहुण्याचे आगमन, नाव आहे एकदम युनिक
मुंबईने जिंकला सामना
मुंबई संघ पुन्हा विजयी मार्गावर आला आहे. हार्दिक आणि कंपनीने सलग दुसरा विजय मिळवला. पण, अजूनही प्लेऑफचा मार्ग मोकळा करण्यासाठी संघाला अधिक प्रयत्न करावे लागतील. येथून मुंबई संघाचा प्रवास कसा होतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.
हे ही वाचा: Who is Karun Nair: करुण नायरची पत्नी कोण आहे? तिच्या धर्माचे भारतात फक्त 70 हजार लोक
अभिषेकने मोडले अनेक विक्रम
अभिषेक शर्मा आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघासाठी खेळत आहे. त्याने 12 एप्रिल रोजी ही विक्रमी खेळी खेळली. या सामन्यात अभिषेकच्या बॅटमधून 10 षटकार आणि 14 चौकार लगावले. त्याने 141 धावांच्या विक्रमी खेळीसाठी फक्त 55 चेंडू खर्च केले. हैदराबादने 246 धावांचे लक्ष्य एकतर्फी पद्धतीने पार केले. अभिषेकने ‘हे फक्त ऑरेंज आर्मीसाठी आहे’ असे लिहिलेले एक चिट काढून त्याचे शतक साजरे केले.