विविध शाळांमध्ये अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडीच्या आधारे वेतनासाठी पात्र ठरवून शासनाची काेट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याच्या प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील संस्थाचालक आरोपी राजू केवळराम मेश्राम (५९
.
यापूर्वी नागपूर शिक्षण विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह अधीक्षक नीलेश वाघमारे यांच्यासह नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक करण्यात आली होती. यापाठोपाठ शिक्षण उपसंचालक कार्यालयातील आणखी तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याने अटकेतील आरोपींची संख्या पाच झाली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
अधिकाऱ्यांचाही समावेश
या घोटाळ्यात माेठे अधिकारीही गुंतले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित करून पहिली कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
२०१९ पासून नियुक्त्या
नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये २०१९ पासून बाेगस प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याची माहिती समाेर आली हाेती. सध्या नागपूर जिल्ह्यात जवळपास ५८० अशा बाेगस कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतनाची उचल केली आहे.