राहुरीचे ग्रामदैवत खंडेराया यात्रोत्सवानिमित्त राहुरी रेल्वे स्टेशन जवळील बीज गुणन प्रक्षेत्रावर जागेवर आयोजित बैलगाडा शर्यतीने हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या राहुरीकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. संक्रापूर येथील रामा पांढरे यांच्या पाखऱ्याने बाज
.
खंडेराया देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला बैलगाडा शर्यतीचा थरार कार्यक्रमात सातारा येथील मयूर तळेकर यांनी पहाडी आवाजातील निवेदनाने बैलगाडा चालक-मालकांसह प्रेक्षकात ऊर्जा निर्माण केली. झेंडा पंच म्हणून किरण तळेकर यांनी काम पाहिले. या शर्यतीत एकूण २३ फेऱ्या पार पडल्या. प्रत्येक फेरीतील विजेत्या बैलगाडा मालकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बैलगाडा शर्यतीसाठी श्रीखंडेराया यात्रा कमेटीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनामुळे अनेक जिल्ह्यातून राहुरीत आलेल्या बैलगाडा मालक-चालकांनी समाधान व्यक्त केले. बैलगाडा शर्यत यशस्वीतेसाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे, सचिव सदाशिव शेळके, प्रतीक तनपुरे, यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष दादासाहेब तोडमल, उपाध्यक्ष अक्षय वराळे व वरुण तनपुरे, खजिनदार राजेंद्र शेळके, अमोल तनपुरे, आकाश येवले, सोन्याबापू जगधने, सुनील भुजाडी, राजेंद्र वाडेकर, शिवाजी वराळे, दत्तात्रय येवले आदींसह नागरिकांनी परिश्रम घेतले.
बैलगाडा शर्यतीचे निवेदक मयूर तळेकर यांचा सन्मान बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक ७१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ५१ हजार रुपये, तृतीय क्रमांक ३१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक २१ हजार रुपये, पाचवा क्रमांक ११ हजार रुपये, सहावा क्रमांक ७ हजार रुपये, आठवा क्रमांक ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. बैलगाडा शर्यतीच्या निवेदकाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल सातारा येथील बैलगाडा निवेदक मयूर तळेकर यांना उपस्थित शौकिनांनी बक्षिसे देऊन सन्मानित केले.