सुरगाणा तालुक्यातील खुंटविहिर येथे श्री स्वामी बाबा यांच्या १०० जयंती निमित्त गुजरात राज्यातील श्री सत्यसाई सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली १०८ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवा
.
आदिवासी समाजात वर्षानुवर्षे गरिबी आहे. पावसाळ्यात कामे आटोपल्यानंतर त्यांना कामाच्या शोधात बाहेरगावी जावे लागते. कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी घरदार सोडावे लागते. शहरात विवाह सोहळ्यात लाखो रुपये खर्च केले जातात. तेवढ्याच पैशात हजारो जोडप्यांचे विवाह पार पडतील, खर्च कमी करण्यासाठी आदिवासी समाजात सामुदायिक विवाह सोहळ्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन मंत्री झिरवाळ यांनी केले.