कळमनुरी तालुक्यातील कवडी शिवारातील कालव्याच्या मार्गावर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी ता. 21 पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीर वाळू उपसा करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले आहे. या प्रकरणी चालका विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन
.
हिंगोली जिल्हयात अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील पूर्णा, पैनगंगा, कयाधू नदीच्या पात्रातून यंत्राच्या मदतीने वाळू उपसा करून त्याची वाहतूक केली जात आहे. त्याबाबत तक्रारी केल्या जात होत्या. त्यामुळे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मागदर्शनासाठी तीन विशेष पथके स्थापन केली आहेत. या शिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या पथकाने दोन दिवसांपुर्वीच वाळू व वाहने असा 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
दरम्यान, कवडी शिवारात कयाधू नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून नांदेड जिल्हयातील हदगावकडे नेली जात असल्याची माहिती पोलिस अधिक्षक कोकाटे यांना मिळाली होती. त्यावरून विशेष पथकाचे उपनिरीक्षक सतीष ठेंगे, जमादार शामराव गुहाडे, सुभाष घोडके, निखील बारवकर यांच्या पथकाने आज पहाटे चार वाजता कवडी शिवारातील कालव्याच्या मार्गावरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली होती.
या तपासणीमध्ये एका ट्रॅक्टरमध्ये वाळू आढळून आली. पोलिसांच्या पथकाने चालक विजय परघणे (रा. नेवरी, ता. हदगाव) याची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी वाळू, ट्रॅक्टर व ट्रॉली असा 8.50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक ठेंगे यांच्या तक्रारीवरून विजय परघणे याच्या विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादा शेख अन्सार पुढील तपास करीत आहेत.