अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) माजी आमदार झीशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. धमकीत 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा धमकीचा संदेश एका अज्ञात मेल आयडीवरून पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
.
यामध्ये झीशान यांना धमकी देण्यात आली की जर पैसे दिले नाहीत तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. झीशान सिद्दीकी यांनी तात्काळ मुंबई पोलिसांना या मेल बाबत कळवले आहे. त्यानंतर वांद्रे पोलिस ठाण्याचे एक पथक त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले.
12 ऑक्टोबर 2024 रोजी झीशान यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हाय-प्रोफाइल हत्येची जबाबदारी नंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…