जायकवाडी उत्तर पाटबंधारे विभागाच्या शासकीय निवासस्थानांवर अतिक्रमण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. विभागाने अतिक्रमणधारकांना सात दिवसांत घरे रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. मात्र ही घरे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी तोंडी विकल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ
.
ज्यांनी ही घरे विकत घेतली, त्यांनाच आता अतिक्रमण हटावची नोटीस मिळाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अनेकांनी आम्ही पैसे देऊन घरे घेतली, आता ती रिकामी करायची असेल तर आमचे पैसे परत द्यावेत, अशी भूमिका घेतली आहे. कधीकाळी संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी शासकीय वसाहत म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी वसाहतीत सातशेहून अधिक कर्मचारी राहत होते. आता मोजकेच कर्मचारी उरले आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी इतरत्र गेले, पण घरे सोडली नाहीत.
या प्रकरणामुळे पाटबंधारे विभागाची अडचण वाढली आहे. अतिक्रमण हटवायचे की विक्री केलेल्यांचे पैसे परत द्यायचे, यावर विभाग गोंधळात सापडला आहे. Q : काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निवासस्थाने जमा केल्याचे दाखवत तिच निवासस्थाने इतरांना विक्री केली आहेत काय कारवाई करणार A .अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. सात दिवसात जायकवाडी वसाहती मधील अतिक्रमण काढली जाणार आहेत. Q : आता प्रशासन काय कारवाई करणार? A : ज्यांनी परस्पर घरे विक्री केली त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल. Q : काही निवासस्थाने मजबूत काही निवासस्थाने मोडकळीस आलेत का? A : निवासस्थाने परस्पर विक्री केल्याचे कळले आहे. ज्याच्या नावे निवासस्थाने होती त्यांनी कोणत्या आधारे इतरांना ही निवासस्थाने विक्री केली त्याची चौकशी करण्यात येईल. प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग ज्या कर्मचाऱ्यांनी थेट निवासस्थाची विक्री केली नाही. त्यांनी ती निवासस्थाने चक्क भाड्याने दिली आहेत. महिन्याला हजार रुपये दराने भाडे देखील काही महाभाग सेवानिवृत्त कर्मचारी घेत आहेत. आता ही घरे खाली करण्याच्या नोटीस देण्यात आल्याने जायकवाडी मधील विक्री केलेले निवासस्थाने खाली होणार का व ज्यांनी निवासस्थानाची परस्पर विक्री केली त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार हे बघावे लागणार आहे.
चौकशी करुन वसुली करण्याची मागणी ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थाने विक्री केली आहेत. त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्याच्या पेन्शन मधून पैसे वसूल करण्याची मागणी जायकवाडी येथील अनेकांनी केली आहे.