Maharashtra Breaking News Live 22 April 2025 | Maharashtra Mumbai Pune Nashik Nagpur | Maharashtra Breaking News | दिव्य मराठी अपडेट्स: भंडाऱ्यात हिट अँड रन; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, पती-पत्नीसह 5 वर्षीय चिमुकली ठार – Maharashtra News

0



महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स…

.

भंडाऱ्यात हिट अँड रन; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील पाथरी येथे दुचाकीचा बोलेरो पिकअपने धडक दिली यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतकात पती – पत्नीसह त्यांच्यासोबत असलेली शेजाऱ्यांची पाच वर्षीय चिमुकली अशा तिघांचा समावेश आहे. ही घटना मध्यरात्री भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी ते पाथरी मार्गावर घडली.

मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू संशयास्पद

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले राजेंद्र घनवट यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यांनी धनंजय मुंडे यांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र, आता या दरम्यान त्यांच्या पत्नी मनाली राजेंद्र घनवट यांचे निधन झाले आहे. त्यांचे निधन हे नैसर्गिक नसून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा

राज- उद्धव ठाकरे यांच्यात भावनिक ओलावा- संजय राऊत

राज ठाकरे सध्या मुंबईत नाहीत. ते कोणत्या ठिकाणी गेले हे मला माहित नाही. मात्र सध्या ते मुंबईत नाहीत. राज ठाकरे यांनी हात पुढे केला आहे आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र सध्या ते मुंबईत नाहीत. ते दोघे परत आल्यानंतर याविषयी चर्चा करू. मात्र यावर सध्या रोज चर्चा करून त्याचे गांभीर्य कमी करण्याचा काहीही उपयोग नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा

वळसंगकर आत्महत्या प्रकरण: मुलगा-सुनेचीही चौकशी होणार?

सोलापूर शहरातील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून कुटुंबाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांचे पुत्र आणि या प्रकरणातील फिर्यादी असलेले डॉ. अश्विन वळसंगकर आणि त्यांची सून डॉ. सोनाली वळसंगकर यांना पोलिस चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सविस्तर वाचा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. धमकीत 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा धमकीचा संदेश एका अज्ञात मेल आयडीवरून पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सविस्तर वाचा

यवतमाळ: पत्नीच्या मानेवर‎ कुऱ्हाडीने वार

चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोवर कुऱ्हाडीने वार करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळच्या घाटंजी येथील नेहरूनगरमध्ये सोमवारी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सविस्तर वाचा

सेन्सेक्स 250 अंकांनी वाढून 79,650 वर आठवड्याचा दुसरा ट्रेडिंग दिवस, शेअर बाजार आज तेजीत आहे. सेन्सेक्स ७९,६५० च्या पातळीवर व्यवहार करत आहे, सुमारे २५० अंकांनी वाढला आहे आणि १० अंकांनी खाली आला आहे. निफ्टी देखील ५० अंकांपेक्षा जास्त वाढला आहे, तो २४,२०० च्या पातळीवर आहे. सविस्तर वाचा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here