Bhandara Accident A speeding car hit a two-wheeler, killing a five-year-old child along with her parents | भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात: भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, आई वडिलांसह पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू – Nagpur News

0


भंडारा जिल्ह्यातील पाथरी येथे दुचाकीचा बोलेरो वाहनाने धडक दिली यात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तुमसर तालुक्यातील पाथरी गावाजवळ ही हा अपघात घडला. रात्री 11 च्या सुमारास एकाच दुचाकीने चार जण जात असताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो गाडीने जोरदार धडक

.

मृतकांमध्ये पाच वर्षीय मुलीचा देखील सहभाग आहे. कैलाश मरकाम (42), पारबता मरकाम (36), यामिनी कंगाली (5) वर्षीय, व दुर्गा कंगाली (30) असे मृतकांचे नाव आहे. या संदर्भात गोबरवाही पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अधिकची माहिती अशी, चिखला (माईन) येथील कैलाश मरकाम त्याची पत्नी पारबता कैलाश मरकाम, शेजारी राहणाऱ्या सुषमा दुर्गाप्रसाद कंगाली आणि तिची पाच वर्षाची मुलगी यामीनी दुर्गाप्रसाद कंगाली हे चौघे दुचाकीने मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न कार्य पार पडल्यावर ते रात्री स्वगावी परतत असताना रामनगरजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

नाकाडोंगरी जवळील चांदमारा येथे मध्यप्रदेशातील हेटी गावाहून आलेल्या वरातीमध्ये छतेरा येथील बोलेरो वाहन (चालकाचे नाव दिनेश गौपाले) सहभागी झाले होते. माहितीप्रमाणे, चालकाने लोभीजवळ एका इसमास धडक दिली, ज्यामुळे संबंधित इसमाने जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. या गोंधळात बोलेरो सुसाट मध्यप्रदेशकडे निघाली यातच रामनगरजवळ या वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here