Pravin Tarde Emotional Post Santosh Jagdale Death Pahalgam Terror Attack | आतंकवाद आज घरात आला: संतोष जगदाळेंच्या मृत्यूनंतर प्रविण तरडेंची भावनिक पोस्ट, पोंक्षे म्हणाले- पुर्रोगाम्यांनो दहशतवादाला धर्म असतोच – Mumbai News

0


पर्यटनासाठी गेलेल्या लोकांना धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. या धक्कादायक घटनेचा तीव्र निषेध होत असून देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. अशातच लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडेंच्या मित्रानेही या हल्ल्यात जीव गमावला आहे. त्यांनी आतंकवाद आज घरात आ

.

मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी 2.45 वाजता झालेल्या या हल्ल्यात 20 हून अधिक लोक जखमी झाले. लष्कर-ए-तैयबाची शाखा द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, या हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही.

प्रविण तरडेंची पोस्ट काय?

प्रवीण तरडेंनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलंय की, आतंकवाद आज घरात आला..माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात गेला. मित्रा संतोष माफ कर आम्हाला. आम्ही काही करु शकत नाही.

पुर्रोगाम्यांनो दहशतवादाला धर्म असतोच- पोंक्षे

दुसरीकडे अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलंय की,आता घरात घुसून मारा.एकालाही सोडू नका अमित शहा व मोदीजी.पुर्रोगाम्यांनो दहशतवादाला धर्म असतोच असतो.

पहलगाम नरसंहार अत्यंत भयानक- विचारे

अंशुमन विचारे म्हणाला की, पहलगाम नरसंहार अत्यंत भयानक आणि प्रचंड चीड आणणारा आहे. याला कारणीभूत असलेल्या प्रत्येक देशद्रोही दहशतवाद्यांचा कायमचा नायनाट हीच श्रद्धांजली असेल. आता यात राजकारण नको. नाहीतर अजून सामान्य माणसाला बळी जावं लागेल.

“त्या हरामखोरांकडून” सुधरायची अपेक्षा कधी थांबवणार?- तेजस्विनी पंडित

अनेक प्रश्न मनात घिरट्या घालत आहेत…. दहशतवाद्यांची जात दरवेळेला एकच कशी असते? हे हल्लेखोर तिथे स्थानिक मदतीशिवाय पोहोचू शकतात का ? हिंदू राष्ट्रात, एक हाती हिंदू सरकारात इतर ही नाहीत पण हिंदूच सुरक्षित नाहीत? अश्या घटना घडतात तेंव्हा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर, इंटेलिजन्स वर विश्वास कसा ठेवायचा? हे आपल्या भारत सरकारचं अपयश नाही ? “त्या हरामखोरांकडून” सुधरायची अपेक्षा कधी थांबवणार आपण ? इतक्या हल्ल्यांनंतरही “त्यांच्या” घरात घुसून त्यांना का नाही मारत आहोत आपण ? निष्पाप लोकांचा जीव गेला, त्यांच्या परिवाराचं सांत्वन कसं करणार आपण ? असे अनेक प्रश्न…… तुम्हालाही हे भेडसावतात ? काळी रात्र , सुन्न मन!

कलमा न येणाऱ्यावर गोळीबार

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांची नावे विचारली आणि त्यांना कलमा म्हणायला लावला. त्यापैकी एक उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदी होता, ज्याला त्याचे नाव विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी डोक्यात गोळी मारली. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि युएईमधील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही मृत्यू झाला.

रूपाली ठोंबरे कुटुंबासह जम्मू काश्मीरमध्ये अडकल्या

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे या देखील केले जम्मू-काश्मीरला गेलेल्या आहेत. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्यांनी आम्ही सर्वजण सुखरुप असल्याचे त्यांनी सांगितला आहे. तसेच अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्र येण्यासाठी तात्काळ सोय करण्याची विनंती देखील त्यांनी सरकारकडे केली आहे.

या संदर्भात रूपाली ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून आपण जम्मू-काश्मीरमध्ये असल्याचे सांगितले आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी देखील आम्ही जाऊन आलो आहोत. त्यामुळे आम्ही सर्वजण खूप घाबरलेलो असल्याचे रूपाली ठोंबरे यांनी सांगितले. आमच्या सोबत नाशिक मधील देखील काही पर्यटक आहोत. मात्र, आम्ही सर्व सुरक्षित असलो तरी आम्हाला इथून निघण्यासाठी विमानाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here