पोहेगांव प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण कोपरगाव तालुक्यात एकाच दिवशी सेंद्रिय शेती अंतर्गत जीवमृत तयार करन्याची मोहीम आज बुधवार दि. 23/04/2025 रोजी राबवीण्यात आली
कोपरगाव कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व काळावे , तसेच रासायनिक खते, औषधांचा मानवी शरीरावर होणाऱ्या दीर्घकालीन दुष्परिणाम बाबत शेतकऱ्यांमध्ये जनगजागृती व्हावी व जास्तीत जास्त क्षेत्र सेंद्रिय शेती खाली यावे यासाठी मोहीम स्वरूपात एकाच दिवशी तालुक्यातील सर्व गावामध्ये जीवमृत बनवीण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
दिवसेंदिवस रासायनिक खते व औषधे यांचा होणारा अति वापर यामुळे जमिनी ची सुपीकता खालावली असून , जमीन मोठ्या प्रमाणात क्षारपड व नापिक होत असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत आहे व उत्पादन खर्च मात्र वाढत आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन कोपरगाव कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन सेंद्रिय शेतीचे धडे शेतकऱ्यांना देत आहे
200 ली. जीवामृत तयार करण्यासाठी देशी गायीचे 10 किलो शेण, 10 ली गोमूत्र, 1 किलो बेसनपीठ, 1 किलो जीवाणू माती, 1 किलो गूळ यांचे मिश्रण 200 ली च्या टाकीत अंबवून पिकांना फवारणी द्वारे किंवा जमिनीतुन देता येते
तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याकडे जीवामृत बनविन्याची ची मोहीम यशस्वी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी सुनील घारकर, साईनाथ मलिक, तेजस्विनी मोटे यांच्या मार्गदर्शना खाली कृषी पर्यवेक्षक सुनिल गावीत, संजय घनकुटे, राजेश तुंबारे, पांडुरंग जाधव, ज्ञानदेव ठाकरे, यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक मेहनत घेत आहे तसेच या मोहिमेस शेतकऱ्याचा देखील मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे