पोलिस चौकीबंदच अज्ञात चोरट्यांनी डाव ‘ साधला

0

रात्रीची दुचाकीवरील गस्त बंदच गुन्हेगारीने डोके वर काढले ; एकाच रात्रीत चार ठाकाणी चोऱ्यां

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा शहरातील राहुरी फँक्टरी – श्रीरामपूर रस्त्या लगतची चार दुकाने फोडून रोख रक्कमेसह ३५ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला.देवळाली प्रवरा शहरात स्वतंत्र पोलिस चौकी असताना हि पोलिस चौकी गेल्या दिड वर्षा पासून बंद अवस्थेत आहे.शहरात रात्री दुचाकीवरील गस्त बंद झाल्याने गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा उचलत चोरीचा डाव साधला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी पहाटे २ ते ३ च्या दरम्यान सोसायटी चौकाजवळील राजेंद्र सुखदेव उंडे यांचे ओमसाई किराणा दुकान असून या किराणा दुकानाच्या पाठीमागिल बाजुने पत्रा कापून दुकानात शिरण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांचा होता.परंतू उंडे यांनी काही दिवसापुर्वीच पत्र्याच्या आतील बाजुला लोखंडी जाळी बसविली असल्याने अज्ञात चोरट्यांना हि जाळी तोडता आली नसल्याने चोरी करण्याचा डाव फसल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा सुनिल सांबारे यांच्या अवधुत किराणा दुकानाकडे वळविला.किराणा दुकानाच्या गोडावूनचा पाठीमागिल बाजूने पत्रा कापून गोडावून मध्ये प्रवेश केला. गोडावून व किराणा दुकानाचा मधील पत्रा व सनमाईक रँकच्या मागिल बाजू फोडून दुकानात प्रवेश केला दुकानातील गल्ल्यातील ९ हजार ५०० रुपये रोख व दुकानातून गोडतेलाचे ५ लि.८ ड्रम तर विविध प्रकारचे बिस्कीटाचे ५ बाँक्स दोन्हीची एकुण किमंत ११ हजार ५००रुपयांचा मुद्देमाल असा एकुण २१ हजार रुपयांची चोरी करण्यात आली.या दुकानात चोरी करताना चोरट्याने डोक्यावर खोके घातले व नंतर चोरी केल्याचे सीसीटिव्ही मध्ये कैद झाले आहे.

चोरट्यांनी सोसायटी डिजेल पंपाजवळील प्रतिक अनिल खुरुद यांचे खुरुद पाटील अँग्रो ट्रेडर्स या दुकानाचा चोरट्यांनी पाठीमागिल बाजूने पत्रा कापून दुकानात प्रवेश या दुकानात मोठ्या प्रमाणात उचकापाचक करण्यात आली.येथुन ५ हजार रुपये रोख रक्कम व किमंती वस्तूवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
दत्त मंदिरा जवळील कविता दिलीप भालेकर यांचे श्रीराम जनरल स्टोअरच्या दुकानाचा मागिल बाजूने पत्रा कापला परंतू चोरट्यांची येथे पत्रा कापताना चुक झाल्याने श्रीराम जनरल स्टोअरच्या शेजारील मोकळ्या गाळ्याचा पत्रा कापला गेल्याने येथे हि चोरट्यांचा चोरीचा डाव फसला.येथू मोकळ्या हाताने चोरट्यांना जावे लागले.
चोरी झाल्याची माहिती समजताच शिंदे सेनेच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे,माजी नगरसेवक सचिन ढुस, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष डाँ. विश्वास पाटील,अमोल ढुस ,मुस्ताक शेख आदींनी धाव घेतली. सायंकाळ पर्यंत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. राहुरीचे पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पो.काँ.गणेश लिपणे,अंबादास गिते आदी भेट देवून पाहणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here