सौरव ढाकणे : माझा हा चौथा प्रयत्न होता, जास्त क्लास केले नाही. परंतू, केंद्रीय परीक्षांचा अभ्यास करणारे तसेच सेवेत असलेल्या वरिष्ठांनी कोणती पुस्तके वाचावी याबाबत मार्गदर्शन केले. इंग्रजी वृत्तपत्र वाचले, त्याचबरोबर दैनिक दिव्य मराठीत संपादकीय पानावर
.
प्रतिनिधी | अहिल्यानगर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिल्ह्यातील उमेदवारांनी यशाला गवसणी घातली आहे. चौघांनी जणांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. यात निंबळक येथील एका अंगणवाडी सेविकेचा सुपूत्र ओंकार खुंटाळे, पाथर्डी तालुक्यातील ज्ञानेश्वर मुखेकर, ढाकणवाडी येथील सौरव ढाकणे, पारनेरचा अभिजित आहेर यांनी यश मिळवले. २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत तालुक्यातील निंबळक येथील ओंकार राजेंद्र खुंटाळे याने यश मिळविले. ११३२ पदांसाठी ही प्रक्रिया राबवण्यात आली. ओंकारने ६७३ वा क्रमांक मिळवत या परीक्षेत यश संपादन केले. ओंकारची आई मिनाक्षी खुंटाळे या अंगणवाडी सेविका आहेत. वडील एका सेवा सहकारी सोसायटीत कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यातून ज्ञानेश्वर खुंटाळे तसेच सौरव ढाकणे यांची निवड झाली. ढाकणे यांनी ६२८ वा, मुखेकर यांनी ७०७ वा, तर अभिजित आहेर यांनी ७३४ व्या रँकने क्रमांक पटकावला आहे. पारनेर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दुर्गम भागातील पळसपूर येथील अभिजित आहेर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ७३४ व्या रॅंकने उत्तीर्ण झाला. गेल्या चार वर्षांपासून अभिजित विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे.भारतीय गुप्तचर खात्यातही अभिजितची निवड झाली आहे. मात्र त्याने गुप्तर खात्यात दाखल होण्यासाठी मुदतवाढ घेतली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली भारतीय वनसेवेची मुख्य परीक्षा अभिजित उत्तीर्ण झाला. बुधवारी (२३ एप्रिल) दिल्ली येथे आयोगाच्या कार्यालयात अभिजितची वनसेवेची मुलाखत होणार आहे. अभिजितचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण शिरूर (पुणे) येथील विद्याधाम प्रशालेत झाले,तर अभियांत्रिकीचे शिक्षण पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) झाले.
ओंकार खुंटाळे : २०१८ नंतर पुणे येथे जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. यापूर्वी एकदा मुलाखतीर्यंत पोहोचलो होतो, पण निवड झाली नव्हती. त्यामुळे उणिवा शोधून प्रयत्न सुरू ठेवले. संयम ठेवला, प्रश्नपत्रिकांचा पॅटर्नवर मी काम केले. त्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून अभ्यास केल्याने यश मिळवता आले.