Vir Das Slams Air India : दुखापतग्रस्त पत्नी, तुटलेली सीट आणि प्रचंड मनस्ताप…; Air India वर वीर दासची संतप्त पोस्ट – Pressalert

0


Vir Das Slams Air India : कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास हा नेहमीत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्यानं नुकताच त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या विमानप्रवासाविषयी सांगितलं. त्याकारणामुळे तो चर्चेत आला आहे. अभिनेत्यानुसार, त्याची पत्नी शिवानी माथुरला विमानानं प्रवास करत असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. नेमकं काय काय घडलं हे सगळं वीर दासनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत सांगितलं. वीर दासनं सांगितलं की त्याची पत्नी शिवानीचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याला काही कारणांमुळे दिल्लीला जावं लागलं. त्यावेळी शिवानीसाठी त्यानं एयर इंडियाचं तिकिट बूक केलं. त्यानंतर त्यानं एक व्हील चेयर बूक केली. पण जेव्हा त्याला व्हीलचेअरची गरज लागत होती तेव्हा केबिन क्रूनं त्याच्याकडे रागात पाहिलं आणि त्याला व्हील चेअर देखील दिली नाही.  

वीर दासनं सांगितलं की एयर इंडियाच्या विमानानं दिल्लीत लॅन्ड केल्यानंतर त्याच्या पत्नीच्या पायला फ्रॅक्चर होता तरी देखील तिला व्हीलचेअर देण्यात आली नाही. त्यामुळे शिवानीला फ्रॅक्चर्ड पायासोबत विमानाचा शिडी उतरावी लागली. मुंबई ते दिल्लीच्या टेक ऑफ दरम्यान, त्याला फक्त या एका गोष्टीच्या समस्येला तोंड द्यावं लागलं नाही तर आणखी काय काय झालं याविषयी जाणून घेऊया. दासनं सांगितलं की त्यानं तब्बल 50000 रुपयांचं तिकिट घेतलं आणि त्याला जी सीट मिळाली ती तुटलेली होती. सीटचं लेग रेस्ट देखील तुटला होता आणि सीट वाकडी होती. 

आज सकाळी शेअर करण्यात आलेल्या एका एक्स पोस्टमध्ये वीर दासनं लिहिलं की ‘डियर एयर इंडिया, माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे सगळ्यात चांगला केबिन क्रू आहे. ही पोस्ट लिहिताना मला फार वाईट वाटतंय. माझी पत्नी आणि मी व्हीलचेअर बूक केली होती. कारण तिचा पाय फ्रॅक्चर जाला आहे. जो आता ठीक होऊ शकत नाही. आम्ही दिल्लीसाठी टेक ऑफ करक होतो. एका सीटसाठी 50 हजार आम्ही दिले होते. मोडलेलं फूट रेस्ट आणि सीट देखील वाकडी होती. सीट पूर्णपणे सरळंही होऊ शकत नव्हती. त्यातही आम्ही 2 तास उशिरा दिल्लीत पोहोचलो आणि तिथे आम्हाला सांगण्यात आलं की शिड्यांवरूनच उतरायचं आहे. तर, व्हीलचेयर आधीपासून बूक करण्यात आली होती. मी एका एयर होस्टेसला माझ्या पत्नीची मदत करण्यास सांगितलं कारण माझ्याकडे चार बॅग होत्या. पण, मी मदत मागितल्यानंतर तिनं काही प्रतिक्रिया दिली नाही, सगळे एकमेकांकडे पाहत राहिले.’

हेही वाचा : ‘सॉरी बोल…’ तमन्नावर टीका करणारी पोस्ट करून लगेच डिलीट; उर्वशीवर भडकले फॅन्स

वीर दासनं पुढे सांगितलं की ‘त्यानंतर मी एयर इंडियाच्या एका पुरुष ग्राउंड स्टाफच्या व्यक्तीला आमची मदत करण्यासाठी सांगितलं. त्यानं माझ्याकडे पाहिलं. खांदा उचकवला आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलं. फ्रॅक्चर असलं तरी सुद्धी माझी बायको शिड्यांवरून खाल उतरत होती. खासी बसच्या इथे मी एयर इंडियाच्या एका स्टाफमधील एका व्यक्तीला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तो म्हणाला, सर काय करणार… माफ करा. आम्ही टर्मिनलला पोहोचलो. Encalm च्या माणसाला सांगितलं की आम्ही आधीच व्हीलचेअर बुक केली आहे. पण त्याला जसं काहीच माहिती नाही. तिथे खूप व्हीलचेअर्स होत्या, पण स्टाफ कोणीच नव्हतं, कारण फ्लाइट उशीराने आली होती. मीच एक चेअर घेतली आणि तिला बॅगेज क्लेमपर्यंत आणि मग पार्किंगमध्ये गाडीजवळ नेलं. Encalm नं एअर इंडियाला कळवलं, पण तरीही कोणीच आलं नाही. असो, तुमची एक व्हीलचेअर दिल्लीच्या पार्किंगच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. ती परत घ्या.’ या आधी 2022 मध्ये देखील अभिनेत्यानं अशीच एक पोस्ट करत एयर इंडियाचा त्याला आलेला अनुभव सांगितला होता. 




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here