श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचलित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयच्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत, ‘नाटक व सिनेमा: अभिनय, तंत्रज्ञान व व्यावसायिक संधी’ यावर कार्यशाळा घेण्यात आली. कौशल्य आणि आवडीनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्य
.

या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी संधीचे नवे दालन उघडे झाले असून व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांनी कलाक्षेत्राचा विचार करावा असे आवाहन करण्यात आले. महाविद्यालयाच्या सर सी. व्ही. रमण सभागृहात आयोजित या कार्यशाळेत अनेक विद्यार्थी आणि शहरातील निवडक नागरिकांनी सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक प्रसिद्ध नाट्य तथा सिने कलावंत डॉ. चंद्रकांत शिंदे होते. त्यांचा ३९ वर्षांचा रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील अनुभव, संवादात्मक प्रशिक्षण शैली, प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांनी अभिनयाचे विविध पैलू स्वतः अनुभवले. अनेक उदाहरणांसह उपस्थितांना अगदी छोट्या आवडीचे, कौशल्याचे किंवा विचाराचे रुपांतर यशस्वी करियर मध्ये कसे करण्यात आले? हे सांगताना या क्षेत्रामध्ये असणारा पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी याचे आकर्षण याची विस्तृत मांडणी त्यांनी केली. कार्यशाळेत सहभागी झालेल्यांचे स्वागत करतानाा प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले. कार्यशाळेत थिएटर आणि सिनेमा मधील अभिनयातील मूलभूत फरक, थिएटर आणि सिनेमा पर्यंतचा प्रवास, आवाजातील चढ-उतार, शरीरभाषा, इम्प्रोव्हायझेशन, आणि पात्र विकास, सिनेमा निर्मितीची प्रत्येक पायरी: पूर्वनिर्मिती, निर्मिती आणि उत्तरनिर्मिती, छायाचित्रण, संपादन, ध्वनी संकल्पना आणि स्क्रिप्ट लेखन, कॅमेऱ्यासमोर अभिनयाचे प्रात्यक्षिक असे अनेक महत्त्वाचे विषय हाताळण्यात आले. कार्यशाळेची सुरुवात नाट्य तथा सिने क्षेत्रातील करीयरच्या संधी या चर्चेने झाली. प्रास्ताविक डॉ. दिनेश खेडकर यांनी केले. आभार करिअर कट्टाच्या समन्वयक प्रा. डॉ. रेखा मग्गीरवार यांनी मानले. समारोपावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवले. या वेळी पीएम-उषाचे प्रकल्प समन्वयक डॉ. प्रमोद पडोळे, डॉ. मनीष गायकवाड, डॉ. शुभांगी गावंडे, डॉ. श्रद्धा बुट्टे, शरयू गावंडे, नितीन चक्रे उपस्थित होते.
हेही मुद्दे शिकवण्यात आले ः कार्यशाळेत अभिनय, लेखन, दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन, ध्वनी, व्हिडीओ एडिटिंग, लाइटिंग, साउंड मिक्सिंग यांसारख्या विविध सर्जनशील क्षेत्रांतील संधींची सखोल माहिती आणि चित्रपट व नाट्य क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी याबद्दलही माहिती देण्यात आली. कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ अभिनय नव्हे, तर सर्जनशील अभिव्यक्ती, तंत्रज्ञानाचे महत्त्व, आणि उद्योजकतेचे व्यावसायिक पैलूही समजून घेतले. मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत शिंदे यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे व मान्यवर.