Richest Actor In The World Tyler Perry Forbes 2025 list Shah Rukh Khan Tom Cruise break records Entertainment News – Pressalert

0


Richest Actor In The World Tyler Perry : बॉलिवुडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे.  फोर्ब्सने नुकतीच २०२५ च्या (Forbes’ 2025 list) अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जगभरातील 3 हजार डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांना स्थान मिळाले आहे. या यादीत अनेक फिल्म स्टुडिओ मालक, फ्रँचायझी निर्माते, चित्रपट निर्माते आणि अगदी अभिनेत्यांची नावे आहेत. या यादीत जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याला 2356 वे स्थान मिळाले आहे. मात्र, एकही सुपरहिट चित्रपट न देणारा अभिनेता जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे. याने शाहरुख खान, टॉम क्रूझचा रेकॉर्ड मोडला आहे. 

फोर्ब्सच्या 2025 च्या अब्जाधीशांच्या यादीत ज्या अभिनेत्याचे नाव आहे ते नाव जाणून शॉक व्हाल. टायलर पेरी हा  जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या पेरी यांची एकूण संपत्ती 1.4 अब्ज डॉलर्स आहे.

श्रीमंतांच्या यादीत पेरीने जेरी सेनफेल्ड (1.1 अब्ज डॉलर्स), टॉम क्रूझ (800 दशलक्ष डॉलर्स), शाहरुख खान (770 दशलक्ष डॉलर्स) आणि माजी कुस्तीपटू आणि अभिनेता ड्वेन जॉन्सन (700 दशलक्ष डॉलर्स) यांना मागे टाकले आहे.  आश्चर्याची गोष्ट म्हणजे पेरीने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत आजपर्यंत एकही ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेला नाही. पेरी मेडिया फ्रँचायझीसाठी ओळखली जातो. जगभरात या मालिकेने 660 दशलक्ष डॉलर पेक्षा जास्त कमाई केली.

पेरीच्या संपत्तीचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे कंटेंट राइट्स. चित्रपट निर्माता म्हणून पेरी याने निर्मा म्हणून सर्वाधिक कमाई केली आहे. 1990 मध्ये  तयार केलेल्या कंटेंट लायब्ररीच्या माध्यमातून तो बक्कळ कमाई करत आहे.  2019 मध्ये पेरी याने 330 एकरच्या मालमत्तेवर त्याचा कंटेंट स्टुडिओ उघडला.  ज्यामध्ये 12 साउंड स्टेज आहेत, ज्यामध्ये अनेक कस्टम स्टेजचा समावेश आहे. 

शाहरुख खान हा भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. शाहरुख 7600 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. तर जुही चावला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.  जुही चावला 4600 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. 

 




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here