Pahalgam Terror Attack Sanjay Lele Hemant Joshi Atul Mone Pc Live Update | पहलगाम हल्ल्यात लोकांना कसे मारले?: डोंबिवलीतील पीडित कुटुंबीयांनी सांगितली आपबिती; शूट एट साइटचे आदेश देण्याची मागणी – Maharashtra News

0



पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला आहे. यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. यामध्ये डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने डोंबिवलीत हळहळ व्यक्त होत असून संपूर्

.

पहलगाममधील घटनाक्रम सांगताना संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले म्हणाला की, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला तेव्हा माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावर होता. बाबा त्यांना सांगत होते की तुम्ही गोळीबार करु नका. त्यांनी हात वर केला होता. त्यावेळी माझ्या हाताला काहीतरी जाणवले. आधी मला वाटले माझ्या हातावर गोळी लागली आहे. मी पटकन झुकलो आणि उठून नंतर पाहिले तर वडिलांचे डोके रक्ताने पूर्ण माखले होते. मी हे सगळे पाहिले तेव्हा आम्हाला स्थानिकांनी सांगितले की तुम्ही आधी तुमचा जीव वाचवा. जिथे गोळीबार झाला ती जागा अशी आहे जिथे घोड्याने जायला तीन तास लागलात. त्या भागात फक्त घोड्यानेच जाता येते. गाडी किंवा सायकल वगैरे काहीही जात नाही. हल्ला झाल्यानंतर सगळे घोडेवाले आले. बाकीचे पायी चालत उतरत होते. चालत उतरण्यासाठी आम्हाला चार तास लागले. माझ्या आईला अर्धांगवायू आहे. तिला मी आणि माझ्या भावाने खांद्यावर उचलून आणले. काही अंतरावर घोडे होते. मग घोडा करुन आम्ही तिला आधी बेसला पाठवले. आम्ही चार तास चालत बेसला पोहचलो. मला आणि इतर सगळ्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

दुपारी 2 ते अडीचच्या सुमारास झाला गोळीबार

पहलगाम क्लब म्हणून जागा आहे तिथे आम्हाला बसवण्यात आले. साधारण दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. आम्ही संध्याकाळी 6 च्या सुमारास पोहचलो. पुढचे काही तास काहीही माहिती आम्हाला मिळाली नव्हती. त्यानंतर 7.30 च्या सुमारास मला कळले होते की तिघांचा मृत्यू झाला. माझ्या काकांनी एका आयपीएस अधिकाऱ्याशी बोलून त्यांच्या घरी राहू दिले. सकाळी 7 च्या सुमारास मला कळवण्यात आले की तुम्हाला मृतदेहांची ओळख पटवायची आहे. मी ओळख पटवली आणि परत आलो तेव्हा मी सगळ्यांना सांगितले. त्यांनी आम्ही पोलिस कंट्रोल रूममध्ये गेलो. त्यावेळी ओमर अब्दुला, अमित शाह हे सगळे तिथे आले होते. एका चार वर्षांच्या मुलावरही गोळीबार केल्याचे कळले. त्यानंतर माझे काका आणि इतर नातेवाईक घ्यायला आले होते. नंतर आम्ही मुंबईत आलो. आम्ही तिघांचे मृतदेह घेऊन आलो आणि बुधवारी अंत्यसंस्कार पार पडले, असे हर्षल लेलेने सांगितले.

अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने काय म्हणाल्या?

आम्ही जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये गेलो होते. तिथे भरपूर गर्दी होती. सगळे खूप खुश होते. सगळे आनंदी होते. आम्ही फोटो काढत होतो. ऊन असल्यामुळे आम्ही पाणी पिण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी गेलो. आमचे जेवण झाल्यानंतर आम्हाला फायरिंगचा आवाज आला. पण आम्हाला वाटले की पर्यटनस्थळ आहे, त्यामुळे एखादा खेळ असावा, असे समजून आम्ही लक्ष दिले नाही. पण नंतर अचानक फायरिंग चालू झाली. सगळीकडे गोंधळ उडाला. सगळेच लोक घाबरले. आम्ही सगळे खाली झोपलो, असा अंगावर काटा आणणारा अनुभव अनुष्का मोने यांनी सांगितला.

दशहतवाद्यांना जाब विचारताच त्यांनी गोळ्या घातल्या

अनुष्का मोने पुढे म्हणाल्या की, नंतर आम्हाला ते हिंदू कोण आणि मुस्लीम कोण असे विचारत होते. पण त्यांना कोणीही उत्तर दिले नाही. आम्ही कोणीही वेगळे झालो नाही. आमच्यातील एकजण बोलला की तुम्ही असे का करताय, आम्ही काय केले? पण दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. माझे पती म्हणाले की गोळ्या घालू नका. आम्ही काहीही करत नाही. आम्ही इथे बसतो. ते बोलत असतानाच त्यांनाही गोळ्या घालण्यात आल्या, अशीही माहिती अनुष्का मोने यांनी दिली.

हिंदू कोण विचारले, जिजूने हात वर केला अन्…

परत त्यांनी हिंदू कोण आहे? असे विचारले. माझ्या जिजूने हात वरती केला. त्यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. आमच्या घरातले कर्ते पुरुष होते. अशा बऱ्याच जणांना त्यांनी तिथे मारले. दहशतवादी गेल्यानंतर आम्ही माझ्या पतीला तसेच इतरांना हलवण्याचा, उठवण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही काहीच करू शकलो नाही, असा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव त्यांनी सांगितला. यादरम्यान दहशतवादी म्हणत होते की तुम्ही या ठिकाणी दहशत माजवली आहे. पण पर्यटकांनी तिथे नेमके काय केले? हे मला तरी समजले नाही. सरकारने आम्हाला न्याय दिला पाहिजे, अशी मागणी अनुष्का मोने यांनी पत्रकार परिषदेतून केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here