पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर धर्म विचारणा करून दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराचा गुरुवारी ता. 24 कळमनुरीत शिंदेसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला असून केंद्राने आता दहशतवाद्यांना धडा शिकवावा, अशी माग
.
कळमनुरी येथील बसस्थानकासमोर आयोजित निषेध मोर्चास शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, रेखा देवकते, राजेंद्र शिखरे, धनु पाटील दातीकर, विजय बोंढारे, शेषराव बोंढारे, अभय सावंत, बबलू पत्की, आर. आर. पाटील यांच्यासह शिंदेसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. केंद्र शासनाने दहशतवाद्यांचा बिमोड करून पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. यावेळी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरीकांनी श्रध्दांजली वाहण्यात आली.
दरम्यान, औंढा नागनाथ व कळमनुरी येथे राष्ट्रवादीच्या वतीने (शरद पवारगट) बुधवारी ता. 23 रात्री कँन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, तालुकाध्यक्ष रमेश सानप यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरीकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या शिवाय हिंगोली येथे शिंदेसेनेच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी बांधकाम सभापती श्रीराम बांगर, उपजिल्हा प्रमुख लखन कुरील, दीपक निमोदीया, संजय खंडेलवाल, महेश चक्रवार प्रतिक अग्रवाल यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.