मालेगाव बाॅम्बस्फोट २००८ प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ने भाजपच्या भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांना मृत्युदंडाच्या शिक्षेची एनआयएने मागणी केली आहे. सर्व आरोपींना बेकायदेशीर कृत्य (यूपीए)च्या कलम १६ अंतर्गत म
.
यापूर्वी एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह यांना निर्दोष सोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर आता साध्वी प्रज्ञा यांच्यावर कोणतीही दया दाखवू नये, असे एनआयएने युक्तिवादात म्हटले आहे. यामध्ये साध्वी प्रज्ञा, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय राहीरकर, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी यांचा समावेश असून हिंदुत्व विचारसरणीशी जोडलेल्या मोठ्या कटाचा भाग म्हणून बाॅम्बस्फोटाची योजना आखण्याचा व अमलात आणण्याचा आरोप त्यांच्यावर केला.
दीड हजार पानांचा युक्तिवाद एनआयएने मुंबईच्या विशेष न्यायालयात युक्तिवाद करताना मालेगावमध्ये २००८ मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटात सहा मुस्लिमांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जखमी झाल्याचा युक्तिवादामध्ये उल्लेख केला आहे. संपूर्ण युक्तिवाद सुमारे दीड हजारापेक्षा अधिक पानांचा असल्याचेही सांगण्यात आले आहे. एनआयएच्या या युक्तिवादानंतर न्यायालयाने मात्र, यासंबंधित निर्णय अद्याप राखून ठेवला आहे, तर ८ मे रोजी उच्च न्यायालय आपला निर्णय देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
१७ वर्षांपासून खटला प्रलंबित
गेल्या सतरा वर्षांपासून प्रलंबित मालेगावच्या भिक्खू चौकातील स्फोटाचा खटला अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. एनआयएचे विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींना ८ मे रोजी मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला महाराष्ट्र एटीएसने याचा तपास केला. २०१६ मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले.
मालेगाव बॉम्बस्फोट आणि खटल्याचा घटनाक्रम
२९ सप्टेंबर २००८ भिक्खू चौक, मालेगाव येथे बॉम्बस्फोट १० ऑक्टोबर २००८ महाराष्ट्र एटीएसकडून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना अटक. २०१० प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. २०१५ साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांची मोक्कामधून सुटका. २०१७ साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना जामीन मिळाला २०२४ एनआयएच्या विशेष न्यायालयात ३२३ साक्षीदारांचे जबाब.
३० ऑगस्ट न्यायाधीशांच्या कामाचा शेवटचा दिवस
आतापर्यंत या प्रकरणात ५ न्यायाधीश निवृत्त झाले आहेत. न्यायमूर्ती लाहोटीदेखील गेल्या वर्षी निवृत्त झाले. परंतु, स्फोटातील पीडितांच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर त्यांना मुदतवाढ मिळाली. त्यांच्या मुदतवाढीचा शेवटचा दिवस ३० ऑगस्ट आहे. तोपर्यंत या प्रकरणातील अंतिम आदेश पारित केला जाऊ शकतो.
३३ साक्षीदार उलटले
३२३ साक्षीदार ३३ जण उलटले ५ न्यायाधीश २५ वकील ११ आरोपींपैकी ४ जणांना क्लीन चिट
८ मे रोजी न्यायालयात हजर होणार सात आरोपी
१. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, २. ले. कर्नल प्रसाद पुरोहित, ३. सुधाकर चतुर्वेदी, ४. समीर कुलकर्णी, ५. अजय राहीरकर, ६. निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, ७. सुधाकर त्रिवेदी.