With the thrill of day-night tennis ball cricket, badminton, relay running, tug-of-war, Mahavir Cup competition begins at Wadia Park, 2000 players participate | डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेटच्या थरारासह बॅडमिंटन: रिले धावणे, रस्सीखेचने रंगत, वाडिया पार्क येथे महावीर कप स्पर्धेला सुरुवात, 2000 हजार खेळाडुंचा सहभाग‎ – Ahmednagar News

0



शहरातील वाडिया पार्क मैदानावर भगवान महावीर चषक परिवारतर्फे गेल्या १६ वर्षांपासून सुरु असलेल्या महावीर कप २०२५ च्या विविध क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धा २३ एप्रिल ते ४ मे दरम्यान चालणार आहे. यात आयपीएलच्या धर्तीवर डे-नाईट टेनिस बॉल

.

या स्पर्धेच्या सुरुवातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतकांना भगवान महावीर चषक परिवाराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आदर्श व्यापारी मित्र मंडळाचे संस्थापक माजी नगरसेवक संजय चोपडा, अध्यक्ष राजेंद्र तातेड, राजेंद्र गांधी, अतुल शेटीया, अजय गुगळे, डॉ. सचिन बोरा, अमित पितळे, लक्ष्मीकांत शेटिया, प्रीतम गुंदेचा, उमेश मंत्री, निलेश मंत्री, आनंद पितळे, वर्धमान मुनोत आदी परिश्रम घेत आहेत. राजेंद्र गांधी म्हणाले, धकाधकीच्या जीवनात मनुष्य आपल्या आरोग्याकडे अक्षरशा दुर्लक्ष करत असतात. मात्र भगवान महावीर कप स्पर्धेच्या माध्यमातून युवकांमध्ये खेळाची गोडी निर्माण होत आहे. ते व्यायामाकडे आकर्षित केले जाते. त्यामुळे आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होते,

आदर्श व्यापारी मित्र मंडळ व मॉर्निंग क्रिकेट क्लब चे युवक एकत्रित येत शहरात भगवान महावीर कप स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते.

पहिले बक्षीस १लाख ११ हजार १११ रुपयांचे या स्पर्धेत भगवान महावीर कप हे मानाचे पारितोषिक आहे. १ लाख ११ हजार १११ रुपये प्रथम, दुसरे पारितोषिक ५१ हजार रुपये, तिसरे पारितोषिक ३१ हजार रुपये दिले जाईल. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन आदी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मॅन ऑफ द सिरीजचाही पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती आदर्श व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंगवी यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here